Political News | राजाच्या राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रातील सर्वात मोठी बातमी समोर आली असून ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला आहे. सयाजी शिंदे हे हिंदी व मराठी सिनेसृष्टी बरोबरच साउथ इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध नाव असून त्यांनी हिंदी, मराठी, तेलगू, तमिळ या भाषांतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. सयाजी शिंदे आपल्या सामाजिक कार्यामुळे देखील प्रसिद्ध असून त्यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी स्वतःहून पुढे येत लाखो झाडे लावली आणि त्यांना मोठे केले आहे. त्यांनी निर्माण केलेल्या सह्याद्री देवराईचा सर्वत्र कौतुक झाले असून सयाजी शिंदे यांच्या राष्ट्रीय काँग्रेस (अजित पवार) पक्षात झालेल्या प्रवेशामुळे पक्षाला देखील त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवारांच्या उपस्थितीत त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.
छगन भुजबळाने केले मनोगत व्यक्त
“उद्या दसरा आहे आणि आजच आम्हाला दसऱ्याचा उत्सव साजरा करण्याचा भाग्य लागला आहे. नाव जरी मराठी असले तरी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवूला आहे. ते अभिनेते आहेतच, पण त्यांनी समाजात केलेल्या कामामुळे आज ते नेते होणार आहेत. आजवर त्यांनी लोकांच मनोरंजन केलच पण लोकांच्या दुःखाला समजून घेत ते कमी करण्याचे प्रयत्न केला. ते सीनियर आर्टिस्ट आहेत तेव्हा त्यांची ओळख करून देण्याची गरज नाही. राजकारणातील घडामोडी त्यांना माहीत असून ते आमच्याकडे साथ देण्यासाठी आले ही अभिमानाची गोष्ट आहे. सयाजी शिंदे यांचा आमच्या पक्षात प्रवेश ही अजित दादांच्या कामाची पोच पावती आहे. आम्ही तुमचा पूर्ण मानसन्मान राखू.” असे मनोगत पक्षप्रवेशावेळी छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
Political News | तपास यंत्रणेच्या कारवायांवरून अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा
अजित पवारांनी केली मोठी घोषणा
यावेळी, अजित पवार यांनी “मी चित्रपट पाहत नाही. पण सयाजीराव यांचे अनेक चित्रपट पाहिले आहेत. त्यांच्या कारकिर्दीत अनेक सामाजिक कामात आमची भेट झाली आहे. मुळात सयाजीरावांना झाडांची आवड आहे. सह्याद्री देवराई याच्या माध्यमातून त्यांनी राज्यभर वृक्षारोपण केले. त्यांचे काम मोठे आहे. साईबाबांचा, सिद्धिविनायक बाप्पाचा प्रसाद दिला जातो, तसा प्रसाद म्हणून रोपटे दिले जावे असे त्यांनी आम्हाला सांगितले. आम्ही अशा विषयावर चर्चा करत असतो. सयाजीराव राज्यभर पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून काम करतील.” अशी घोषणा अजित पवारांनी यावेळी केली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम