Political News | सोमवार दि. 7 ऑक्टोबर रोजी पुण्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेत येती विधानसभा निवडणूक दिंडोरीतून लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Political News | तपास यंत्रणेच्या कारवायांवरून अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा
पुण्यामध्ये शरद पवार गटाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती
महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीसाठी अद्यापही जागा वाटपाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसून अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाने त्यांच्या स्तरावर इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरूवात केली आहे. त्यातच नाशिक मधील 15 ही मतदार संघातील इच्छुकांना मुलाखतीसाठी प्राचारण करण्यात आले होते. पुण्यातील गुलटेकडी भागातील निसर्ग मंगल कार्यालयात शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व पक्षाच्या संसदीय समितसमोर या मुलाखती पार पडल्या. यावेळी दिंडोरी मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या गोकुळ झिरवाळ यांची उपस्थिती सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली.
नाशकात पिता-पुत्रांमध्ये लढत
दरम्यान, नाशिकमध्ये यापूर्वी झालेल्या मुलाखतीत तसेच पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेतही त्यांची उपस्थिती राजकीय चर्चांचा विषय ठरली होती. त्यात गोकुळ यांच्या या भूमिकेनंतर नरहरी झिरवाळ यांनी “हा आमचा घरातील मुद्दा आहे. गोकुळ माघार घेतील.” असे सांगत या वादावर पडदा टाकला होता. परंतु पवार गटाच्या पुणे येथे झालेल्या मुलाखतीवेळी गोकुळ झिरवाळांनी उपस्थिती लावली. एवढेच काय तर पक्षाने तिकीट दिल्यास वडील नरहरी झिरवाळ यांच्याशी दोन हात करण्याची तयारी त्यांनी दर्शवली असल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत दिंडोरीतून पिता पुत्रांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे.
“सध्या राज्यात महाविकास आघाडीसाठी चांगले वातावरण असून दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी मी इच्छुक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे उमेदवाराची मागणी केली आहे.” असे इच्छुक उमेदवार गोकुळ झिरवळांनी सांगितले.
“निवडणूक लढण्याचा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. पण गोकुळ झिरवाळ यांच्यापेक्षा मी अधिक पावसाळे पाहिले आहेत. राजकारणातील डावपेच मी अधिक जाणतो. वडिलांच्या नात्याने गोकुळ यांना योग्य वेळी, योग्य ठिकाणी थांबवले जाईल.” असे नरहरी झिरवळ म्हणाले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम