Political News | विधानसभा निवडणूक 2024 चा निकाल उद्या म्हणजेच 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. तत्पूर्वीच राज्यामध्ये राजकीय घडामोडींना वेग आले असून एक्झिट पोल्सच्या अंदाजानुसार महायुती किंवा महाविकास आघाडीपैकी कोणालाही स्पष्टपणे बहुमत मिळणार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे युती आणि आघाडीकडून बंडखोर, अपक्षांना जमवण्याचे काम सुरू आहे. युती आणि आघाडीच्या नेत्यांकडून सातत्याने बंडखोर उमेदवार व अपक्ष उमेदवारांना संपर्क करण्यात येत आहे.
तिसरी आघाडी काय भुमिका घेणार?
या परिस्थितीत सर्वांचे लक्ष तिसऱ्या आघाडीकडे लागलं असून तिसरी आघाडी कोणाला पाठिंबा देणार? याबाबत आता बच्चू कडू यांनी आपल्या भूमिकेबाबत मोठा खुलासा केला आहे. “आम्हाला दोन्हीकडून संपर्क करणे सुरू आहे. परंतु अद्याप आम्ही निर्णय घेतलेला नाही. एकदा कल हातात आला की आम्ही निर्णय देऊ.” असं म्हटलं आहे.
काय म्हणाले बच्चू कडू?
“महाविकास आघाडी व महायुती दोन्हीकडून आम्हाला संपर्क करण्याचे काम सुरू आहे. परंतु अद्याप आम्ही कोणताही निर्णय घेतला नसून एकदा कल हातात आला की निर्णय घेऊ. फोन दोन्हीकडून आलेले आहेत. पण आम्ही वेगळ्या सरकारचं स्वप्न पाहतोय. महायुती व महाविकास आघाडीतील नेते जसा संपर्क करत आहेत. तसाच आम्ही देखील संपर्क करत आहोत. माझ्या पक्षाचे चार ते पाच उमेदवार निवडून येतील. आम्ही तिसरी आघाडी केली त्यांना घेऊन सरकार बनवणार आहोत. कोणाला पाठिंबा देण्याऐवजी आपल्या सरकारचा स्वप्न पाहणे महत्त्वाचे वाटते.” असेही ते यावेळी म्हणाले.
Political News | निकालापूर्वीच राजकीय घडामोडींना वेग; मविआ बंडखोरांना परत मिळवण्याच्या प्रयत्नात!
तसेच “एक्झिट पोल्स बोगस असतात. त्याच्यावर विश्वास नाही. उद्याची वाट पहा. कुणाला पाठिंबा देण्यापेक्षा आम्ही आमचं सरकार आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. ही निवडणूक कुठल्या मुद्द्यांनी धरून झालेली नाही. आम्ही काही मूलभूत मुद्द्यांना धरून ही निवडणूक लढण्याचा प्रयत्न केला. परंतु तसे झाले नाही. ही निवडणूक स्थानिक पातळीवरचे उमेदवार जात, धर्म अशा मुद्द्यांना धरून झालेली आहे.” असे देखील म्हटले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम