Political News | निकालापूर्वीच राजकीय घडामोडींना वेग; मविआ बंडखोरांना परत मिळवण्याच्या प्रयत्नात!

0
42
#image_title

Political News | महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ही निवडणूक अधिक रंजक होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. याचं कारण म्हणजे, महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या उलथापालतीत दोन पक्ष विभागले गेले आणि या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती एकमेकांविरुद्ध उभे ठाकले. त्यामुळे निवडणुकीसाठी उमेदवार देताना सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये रस्सीखेच वादविवाद आणि नाराजी नाट्य पाहायला मिळाले. तर उमेदवार याद्या जाहीर झाल्यानंतर युती आणि आघाडी मध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाल्याचे हे दिसून आली. त्यामुळे यंदा अपक्षांची संख्याही वाढली असून मतदानाची टक्केवारी देखील वाढली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत अपक्ष आणि बंडखोर उमेदवार महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधक बंडखोरांना पुन्हा आपल्याकडे वळवण्याच्या प्रयत्नात आहेत.

Political News | मुख्यमंत्रीपदावरून ‘मविआ’तील वाद चव्हाट्यावर; राऊत-पटोले यांच्यातील खडाजंगी सुरूच

निकालानंतर मोठ्या हालचालींची शक्यता

राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 6 प्रमुख पक्ष रिंगणात असून त्यापैकी प्रत्येकी एकापेक्षा जास्त इच्छुकांसह 288 पैकी किमान 1 तृतीयांश मतदार संघात बंडखोरी झाली आहे. तर त्यापैकी किमान 50 प्रमुख बंडखोर सत्ताधारी आणि दोन्ही पक्षांच्या अधिकृत उमेदवारांना संभाव्यतेला धक्का पोहोचवू शकतात. त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून बंडखोर अपक्ष उमेदवारांना संपर्क करण्याचे काम सुरू झाले असल्याची सूत्रांची माहिती आहे. बाळासाहेब थोरात आणि जयंत पाटील यांच्या माध्यमातून विजयाची शक्यता असणाऱ्या बंडखोरांना संपर्क करण्याचे काम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीकडून निकाला आधीच बंडखोरांशी संपर्क साधण्यात येत असून यामुळे आता निकाल लागताच मोठ्या हालचाली घडण्याची शक्यता आहे.

Political News | वर्ध्यात शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते नितेश कराळेंना मारहाण

दरम्यान, या निवडणुकीत युती-आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या विजयाची शक्यता कमी असून भाजपाचे माजी आमदार वैभव पिचड यांनी महायुतीचे उमेदवार व राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार किरण लहामटे यांच्या विरोधात बंडखोरी केली आहे. तर अहमदनगर जिल्ह्यात अकोले येथे राष्ट्रवादी सपाचे अमित भांगरे यांच्या बाजूने हे काम करू शकते. सावंतवाडीत भाजपचे विशाल परब यांनी शिवसेनेचे उमेदवार व राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात बंडखोरी केली. त्याचा फायदा आता उद्धव सेनेचे उमेदवार राजन तेली यांना होऊ शकतो. त्याचबरोबर जुन्नर, कल्याण पूर्व, नांदगाव, श्रीरामपूर, नांदेड उत्तर व नांदेड दक्षिण अशा इतर महत्त्वाच्या मतदारसंघात देखील सत्ताधारी आणि मित्र पक्ष एकमेकांशी लढत आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here