Political News | तपास यंत्रणांनी शनिवारी दिनांक 5 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना आणि मालेगाव शहरात छापेमारी केली. या छापेमारीवरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी “निवडणूक जवळ आली की राष्ट्रीय सुरक्षा या धोक्यात येते. भाजपाला निवडणुकीमध्ये आपला पराभव दिसू लागला की छापेमारी सुरू होते. पाच तारखेला झालेली छापेमारी त्यासाठीच केली गेली होती. उरीचा हल्ला कोणी केला, कोणासाठी केला हे कोडे आजही उलगडू शकलेले नाही. त्यामुळे जनता आता हुशार झाली आहे.” असे म्हणत अंबादास दानवेंनी सरकारवर निशाणा साधला. धात्रक
मनमाड येथे शिवसेना उभा ठाकला पक्षाच्या संपर्क कार्यालयाला भेट
रेल्वेने मुंबईला जात असताना अंबादास दानवे काही वेळा करिता मनमाडला थांबले होते त्यावेळी त्यांनी रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे ग्रामीण जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांच्या संपर्क कार्यालयाला धावती भेट दिली त्यावेळी माध्यमांशी साधलेल्या संवादात हे वक्तव्य केले.
Political News | ‘…तर शिवसैनिक आत्महत्या करतील’; शिंदे गटाच्या आमदाराचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
आघाडीला घवघवीत यश मिळणार!
“राज्यात मविआसाठी चांगले वातावरण असून भ्रष्टाचार, महागाई ,अशांतता, जुमलेबाजी यांनी जनता कंटाळली आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी बोलताना केला. माजी आमदार जगन्नाथ धात्रक, संतोष बळीद, गणेश धात्रक, माधव शेलार, सुनील पाटील, सुधाकर मोरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दानवे यांचे संपर्क कार्यालयात स्वागत केले. यावेळी लियाकत शेख, विजय मिश्रा, इरफान शेख, सनी फसाटे, मन्सूरी यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम