Political News | उमेदवारी डावलेल्यामुळे महाविकास आघाडीच्या नाराज उमेदवारांचा नरहरी झिरवाळांना पाठिंबा जाहीर

0
51
#image_title

Political News | महाविकास आघाडीचे दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रा. अशोक बागुल यांनी, “राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्यांनी आम्हाला सहा महिने अगोदर मतदार संघात फिरायला लावत, उमेदवारीचा आश्वासन दिले. परंतु उमेदवारी द्यायच्या वेळी पक्ष निष्ठेचा विचार न करता उमेदवार आयात करून निष्ठावांतांना डावलले. उमेदवारी देताना आम्हाला विचारले देखील नाही…साधी चौकशीही केली नाही. त्यामुळे आम्ही आपला पाठिंबा दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार नरहरी झिरवाळ यांना जाहीर करत असून महाविकास आघाडीची प्रचंड मते नरहरी झिरवाळ यांना देऊन त्यांचा विजय ऐतिहासिक करू.” असे म्हणत आपला पाठिंबा दर्शविला आहे. त्याचबरोबर, अपक्ष उमेदवार सोमनाथ वतार यांनी देखील नरहरी झिरवाळांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

Political News | “आम्ही अजित पवारांकडे वडिलांच्या नात्याने पाहतो…”; अजित पवारांच्या वक्तव्यावरून स्मिता पाटलांनी व्यक्त केली हळहळ

आम्हाला वाटलं होतं की शरद पवार हे खरोखर निष्ठावंतांना न्याय देतील… 

विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्यदिवशी शेवटच्या दिवशी दिंडोरी पेठ विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. अशोक बागुल यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी, “आम्ही अनेक वर्षांपासून राजकारणात आहोत. सामाजिक, राजकीय जीवनात काम करत असताना आम्ही शरद पवार यांच्या पक्षात झोकून दिले होते. पक्षाच्या वतीने आम्हाला फिरण्यास सांगितले गेले होते त्याप्रमाणे, आम्ही सहा महिने प्रचार करत फिरत होतो. आम्हाला वाटलं होतं की शरद पवार हे खरोखर निष्ठावंतांना न्याय देतील. परंतु पक्षाने आम्हाला डावलले आम्ही निष्ठा ठेवली. तुतारी चिन्ह सगळीकडे पोहोचवले. तिकीट जाहीर केल्यानंतर आम्हाला कोणी विचारले नाही. माझ्याबरोबर फिरणाऱ्या इतर उमेदवारांचाही पक्षाच्या श्रेष्ठींनी विचार केला नाही. म्हणून दिंडोरी पेठचा सर्वांगीण विकास करणाऱ्या नरहर झिरवाळ यांना आम्ही पाठिंबा देत आहोत.” असे म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली.

“झिरवाळांचा साधेपण जनतेला भावते”

पुढे बोलत, “विरोधकांनी पेसाबाबत फेक नरेटीव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला. परंतु झिरवाळ यांनी मंत्रालयात जाळीवर मारलेल्या उडीमुळे 17 संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे केवळ आदिवासी समाजाचाच नव्हे तर जनरल समाजाचा सुद्धा फायदा झाला. विरोधकांना पेसा म्हणजे काय? हे देखील माहित नाही. तालुक्यात सर्वत्र केवळ झिरवाळांचे कौतुक होत होते हे आम्हाला प्रचार करताना दिसून आले, तरी देखील पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली. परंतु पक्षाकडून आम्हाला डावलले गेले. जिल्ह्यातील इतर 5 मतदारसंघात सुद्धा निष्ठावंतांना डावलून आयातांना संधी दिली गेली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला आम्ही आमची ताकद दाखवून देऊ. सर्वच ठिकाणी आमचे कार्यकर्ते कामाला लागले असून सर्वसामान्य जनतेच्या उपयोगी पडणारे नरहरी झिरवाळ हेच तालुक्याचा विकास करू शकतात. त्यांचे साधेपण सर्व जनतेला भावते. त्यामुळे आम्ही त्यांना प्रचंड मतांनी निवडून आणू” असे देखील ते यावेळी म्हणाले.

Political News | ‘इतकी वर्ष झोपले होते का?’; आर. आर. पाटलांवरील वक्तव्यावरून आव्हाडांनी अजित पवारांवर साधला निशाणा

सोमनाथ वतारांचाही झिरवाळांना पाठिंबा

दरम्यान, यावेळी अपक्ष उमेदवार सोमनाथ वतार यांनी देखील नरहरी झिरवाळ यांना पाठिंबा जाहीर केला असून “दिंडोरी पेठ तालुक्यात सर्वात जास्त निधी आलेला दिसत आहे. महाराष्ट्रात झिरवाळ यांनी कामे केली यांच्या कामाची गती प्रचंड असल्यामुळे आपण माघार घेऊन त्यांना पाठिंबा देत आहोत.” असे सोमनाथ वतार यांनी सांगितले. यावेळी जेष्ठ नेते बाळासाहेब जाधव, प्रकाश वडजे, गणपतराव पाटील, जे. डी. केदार, घनश्याम चौधरी, निळवंडीचे माजी सरपंच रामदास गवारी, राजेंद्र उपाडे, कृष्णा मातेरे, परीक्षित देशमुख आदी उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here