Political News | राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून उमेदवार याद्या जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उमेदवारी न मिळालेल्या नेत्यांकडून बंडखोरीचे प्रमाण वाढले आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्याची माहिती समोर आली आहे.
Political News | शिंदेसेनेचं ठरलं; उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष पदे भूषवली
गेल्या अनेक वर्षांपासून दिलीप दातीर हे मनसेमध्ये कार्यरत होते. त्यांनी शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्ष या पदांवर कार्य केले आहे. त्यांच्या राजकीय कार्यकाळात त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे. दरम्यान मनसे नेते अमित ठाकरे यांची गाडी अडवली म्हणून टोल नाका फोडल्यामुळे दिलीप दातीर विशेष चर्चेत आले होते. आता याच दिलीप दातेरांनी मनसेला राम राम ठोकला आहे.
उमेदवारी न मिळाल्याने होते नाराज
तर आगामी विधानसभा निवडणुकीत नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक होते. मात्र ऐन वेळी ही जागा दिनकर पाटलांना दिल्यामुळे दिलीप दातीर नाराज झाल्याची चर्चा होती. याच पार्श्वभूमीवर त्यांनी आता पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. आपण आपला राजीनामा पक्षाच्याशिवांकडे पाठवला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम