Political News | सध्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असून अनेक नेते पक्षांतर करीत आहेत. यातच महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. महायुतीतील घटक पक्ष असणाऱ्या पक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्ते व माजी आमदार हाती तुतारी घेताना दिसत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढताना दिसून येत आहे.
उदय सांगळेंनी फुंकली तुतारी
नाशिक जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शितल सांगळे यांचे पती आणि सिन्नर पंचायत समितीचे माजी गटनेते उदय सांगळे यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला असून यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी सांगळेंच्या गळ्यात तुतारी चिन्हाचा शेला घालून त्यांचे पक्षात स्वागत केले. या पक्षप्रवेशादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते.
Political News | शरद पवारांची मोठी खेळी; विनायक मेटेंचा शिवसंग्राम पक्ष राष्ट्रवादीत विलीन
तुल्यबल लढत पाहायला मिळणार
दरम्यान, उदय सांगळे सिन्नर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असून या पार्श्वभूमीवर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश देण्यात आल्याची चर्चा आहे. या विधानसभा मतदारसंघातून महायुतीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सिन्नर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान ॲड. माणिकराव कोकाटे यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात तुल्यबल लढत पाहायला मिळणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम