Political News | समाजवादी पार्टीचे पक्षप्रमुख खा. अखिलेश यादव उद्या मालेगावच्या दौऱ्यावर

0
1
#image_title

Political News | शुक्रवार दि. 18 ऑक्टोबर 2024 रोजी समाजवादी पार्टीतर्फे शहरातील अजित कल्लू क्रीडांगणावर जनअधिकार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार अखिलेश यादव करणार आहेत. खासदार अखिलेश यादव मालेगावात येणार आहेत. यावेळी इंडिया आघाडीचे नेते पदाधिकाऱ्यांसह शहरातील हजारोंच्या संख्येने नागरिक या सभेला उपस्थित राहणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेश सचिव मुस्तकीम डिग्निटी यांनी दिली आहे.

Political News | राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादिला मुहुर्त लागला; ‘या’ 7 जणांच्या नावांवर शिक्कामोर्तब

खा. अखिलेश यादव उद्या सभेस संबोधित करणार 

समाजवादी पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रदेश सचिव मुस्तकीम डिग्निटी, महानगरप्रमुख शाने हिंद निहाल अहमद यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तसेच पक्षप्रमुख खासदार अखिलेश यादव यांच्यासह खा. इकरा हसन, प्रदेशाध्यक्ष आ. अबू आझमी इत्यादी नेते मालेगावत येणार असून, शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता अजीज कल्लू क्रीडांगणावर जनाधिकार सभेत अखिलेश यादव मार्गदर्शन करणार असल्याची माहिती दिली.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here