Political News | गुन्हे धुण्यासाठी काँग्रेसचा आणखी एक नेता सत्ताधारी पक्षात..?

0
98
Political News
Political News

Political News | महाराष्ट्रात काँग्रेसला एकामागोमाग एक धक्के बसत असून, काँग्रेसला गळती लागल्याची चिन्हे दिसत आहेत. नुकतंच काँग्रेसचे मुंबईतील माजी खासदार मिलिंद देवरा यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला होता. त्यानंतर आता मुंबईत काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का बसणार असून, आता वांद्रे पूर्वचे माजी आमदार बाबा सिद्धीकी आणि त्यांचा मुलगा जीशान सिद्धीकी हेदेखील राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.(Political News)

काही दिवसांपूर्वी माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी त्यांचे ५५ वर्षांपासून काँग्रेसशी असलेले नाते संपवून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. आता यानंतर काँग्रेसला आणखी मोठा झटका बसणार असून, वांद्रे पूर्वचे माजी आमदार बाबा सिद्धीकी हेदेखील आता काँग्रेसला ‘जय महाराष्ट्र’ ठोकण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. बाबा सिद्धीकी हे अजित पवार गटाच्या संपर्कात असून, बुधवारी रात्री ते आणि त्यांचा मुलगा जीशान याने अजित पवार यांची भेट घेतली. त्यामुळे आता मिलिंद देवरा यांच्यानंतर काँग्रेसला आता हा दुसरा झटका बसणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

Deola | सरकारच्या दडपशाहीविरुद्ध देवळ्यात राष्ट्रवादीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

Political News | ईडीपासून वाचण्यासाठी पक्षांतर..?

माजी आमदार बाबा सिद्दीकी हे २०१७ पासून अंलबजावणी संचालनालयाच्या म्हणजेच ईडीच्या रडारवर आहेत. ‘झोपडपट्टी पुर्नविकास प्रकल्प’ प्रकरणात त्यांची ईडिमार्फत चौकशी सुरु असून, मनी लॅन्ड्रींग प्रकरणी २०१८ मध्ये त्यांची तब्बल ४६२ कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली होती. ईडीने १०८ कोटींच्या मनी लॅन्ड्रींग प्रकरणी बाबा सिद्दीकींवर कारवाई केली आहे. २०१२ मध्ये याच प्रकरणात मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.(Political News)

Budget 2024 | ‘सबका साथ सबका विकास’; मोदी सरकार आज जनतेला काय देणार..?

अशी आहे बाबा सिद्दीकींची कारकीर्द 

बाबा सिद्दीकी हे काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत. तीन वेळा ते वांद्रे मतदार संघातून निवडून आलेले आहेत. एक विद्यार्थी नेता म्हणून बाबा सिद्दीकी यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. ते पहिल्यांदा मुंबई महापालिकेत नगरसेवक झाले. त्यानंतर ते १९९९, २००४ व २००९ या वर्षांत वांद्रे मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले. सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्याविरोधात त्यांना पराभव पत्करावा लागला होता. बाबा सिद्दीकी हे मूळचे बिहार राज्यातील पटना येथील आहेत. मात्र, त्यांची राजकीय कारकीर्द ही मुंबईतूनच सुरू झाली होती. त्यांचा वांद्रे परिसरात चांगला राजकीय दबदबा आहे. त्यांनी मंत्रीपदही भूषवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईमध्ये एक मुस्लिम धर्मीय चेहरा हवा होता. त्यामुळे बाबा सिद्दीकींच्या माध्यमातून राष्ट्रवादीला हा चेहरा मिळणार आहे.(Political News)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here