नाशिक – सतत वादाच्या भोवऱ्यात असलेला पिंपळगाव बसवंत टोल नाका पुन्हा एकदा चर्चेत आला असून बुधवारी तेथील महिला कर्मचारी व एका जवानाच्या पत्नी यांच्यात जोरदार हाणामारी झाली.
https://www.instagram.com/p/CihTMJfBRBo/?igshid=YmMyMTA2M2Y=
सविस्तर घटना अशी आहे, सीआरपीएफ जवान आपल्या कुटुंबीयांसोबत निफाडहून पुण्याला जात असताना पिंपळगाव टोल नाक्यावर आपली गाडी थांबवली. ह्यावेळी जवानाच्या पत्नीने गाडी आल्यानंतर त्यांनी आपले शासकीय कार्ड दाखवून खासगी गाडी सोडण्याची विनंती केली. मात्र टोलनाक्यावरील महिला कर्मचाऱ्यांनी तुम्हाला टोल भरावाच लागेल, इथे शासकीय कार्ड चालणार नाही असे सांगितले. त्यामुळे सीआरपीएफ जवानाने टोलचे रीतसर पैसे भरले व तिथून निघत होते. मात्र, पैसे भरून झाल्यानंतर टोल नाक्यावरील महिला कर्मचारी अर्वाच्य भाषेत काहीतरी बोलली. यावरून जवानाच्या बाजूला बसलेली त्याची पत्नी गाडीतून उतरताच तिला जाब विचारला आणि महिला कर्मचारी यांच्यात शाब्दिक बाचाबाचीला सुरवात झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की त्याचे रूपांतर थेट हाणामारीत घडले.
विशेष म्हणजे, यावेळी समोर उभे असलेल्या इतर कर्मचाऱ्यांनी हा वाद न सोडवता त्याचे व्हिडियो शुटींग केले. अखेर पिंपळगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी येताच त्यांनी ह्या वादावर पडदा टाकला. सुरवातीला तिथल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून घेण्याची मागणी होती. मात्र, पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारी ऐकून नंतर त्यांच्यात समजूत घालत माफीनामा लिहून हा वाद मिटवला.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील ह्यांना अश्याच प्रकारचा अनुभव आला होता. त्यानंतर पिंपळगाव पोलिसात त्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखलही झाला होता. तसेच प्रवासी-कर्मचारी यांच्यात अनेकदा वादाची ठिणगी पडली आहे. मात्र, असे असूनही टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांची मुजोरगिरी अद्यापही सुरूच असल्याने प्रवाश्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम