हरसूल : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल येथील आदिवासी सेवा समिती नाशिक संचलित कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालयातील कला शाखेत शिक्षण घेत असलेली बर्डापाडा (ता.पेठ) येथील कविता लहारे या विद्यार्थिनीला सर्पदंश झाल्याने मृत्यूला कवटाळावे लागले आहे.नुकतेच या विद्यार्थीनीच्या वारसांना विद्यालयाकडून रोख स्वरूपात एकवीस हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. विद्यालयाच्या या सुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हरसूल (ता.त्र्यंबकेश्वर)येथे आदिवासी सेवा समिती नाशिक संचलित कर्मवीर भाऊसाहेब हिरे माध्यमिक व उच्य माध्यमिक विद्यालय आहे. या विद्यालयात कविता लहारे ही विद्यार्थिनी बारावी कला शाखेत शिक्षण घेत होती.सोमवार (दि.२९)रोजी रात्रीच्या सुमारास कविता झोपेत असतांना सर्पदंश झाला. या सर्पदंशाने कविताचा मृत्यू झाला आहे. आईवडील अंधअपंग असल्याने लहानपणापासून कविता लहारे हिच्यावर घरातील दोन लहान बहिणी व आई वडील या कुटुंबाची सर्वांगीण जबाबदारी होती.
लहारे कुटुंबातील कवितासारखे कुटुंब प्रमुखच गेल्याने कुटुंबावर हळहळ व्यक्त करण्याची वेळ आली आहे.ही गोष्ट विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र बडोगे यांना समजताच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सामाजिक बांधिलकीतुन एकवीस हजार रुपये जमा करण्यात आले. त्र्यंबकेश्वर प.स. समितीचे माजी उपसभापती रवींद्र भोये, प्राचार्य राजेंद्र बडोगे, उपप्राचार्य पी.एस. महाले यांच्या हस्ते आईवडिलांकडे रोख स्वरूपात सुपूर्द करण्यात आली. यावेळी माजी उपसभापती रवींद्र भोये यांनी ही दोन हजार रुपयांची लहारे कुटुंबीयांना मदत केली.
यावेळी प्राध्यापक बी.डी. खैरनार, एस. ई. भाबड, एस. एच. पाटील, भरत खोटरे आदींसह विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम