Skip to content

नाशिक पोलिसांची कामगिरी ; ४ तासांत आरोपींच्या आवळल्या मुसक्या..


Nashik Crime | दोन दिवसांपूर्वी झालेल्या जुन्या वादाची कुरापत काढून एका अज्ञात व्यक्तीने चार साथीदारांसोबत  तरुणावर सपासप वार करून निघ्रूण  हत्या करण्यात आली होती. ही घटना पंचवटीतील मखमलाबाद रस्त्यावरील गुंजाळ मळा परिसरात शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली होती.
दरम्यान, पंचवटी पोलिसांनी या प्रकरणातील काही संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सागर विष्णु शिंदे. वय २८, राहणार क्रांती नगर, पंचवटी असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

Manoj Jarange | उपमुख्यमंत्र्यांनी ही येडपटं पाळलीच कशी?

सदरचा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्ह्यातील आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याबाबत पोलीस आयुक्त अंकुश शिंदे.  किरण कुमार चव्हाण –  पोलीस उपायुक्त – परिमंडळ १ , सिद्धेश्वर धुमाळ – सहायक पोलीस आयुक्त,  यांनी यासंदर्भात आदेश केले होते. या अनुषंगाने पंचवटी पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी गुन्हेशोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित केदार व अंमलदार यांना सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक सूचना केल्या. यानुसार पंचवटी गुन्हे शोध पथकाने वेगाने तपासकार्य हाती घेत. गुन्ह्यातील मुख्य आरोपी – केदार साहेबराव इंगळे यासोबत साथीदार नाशिकमध्ये  असल्याबाबत माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक- मौजे सुकणे येथे पोहोचले असता. आरोपींना पोलिसांचा सुगावा लागताच त्यांनी तेथून पळ काढला व ते मराठा  विद्या प्रसारक हायस्कूलला लागून असलेल्या उसाच्या शेतात घुसले, सह पोलीस निरीक्षक मिथुन परदेशी व सोबत असलेले गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांनी आरोपींचा पाठलाग करून त्यांच्या मुसक्या आवळल्या, आरोपींना पंचवटी पोलीस ठाणे येथे आणून त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
या खुनाचा तपास ४ तासाच्या आत करून गुन्हा उघडकीस आणला गेला.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक – जितेंद्र सपकाळे हे करत आहेत. (Nashik Crime)

पंतप्रधान मोदींचा आज मुंबई दौरा – ऑलिम्पिक समितीच्या सत्राचं करणार उद्घाटन


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!