Onion Rate| मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस लांबल्यामुळे कांदा पिकाला उशीर झाला. त्यामुळे किमंतीमध्ये कमालीची वाढ होताना दिसत आहे. देशभरात कांद्याचे भाव वाढत असून, काही दिवसांपूर्वीच २५ रुपये प्रतिकिलोने विकला जाणारा कांद्याने आता थेट ५० रुपयांचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे शेतकरी चांगलेच सुखावले आहेत. दरम्यान, मागच्या महिन्यात केंद्राने कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यात शुल्क लावल्यामुळे शेतकरी तसेच व्यापारी रस्त्यावर उतरले होते.
मात्र सरकार आपल्या निर्णयावर ठामच होते. ऐन सणासुदीच्या तोंडावर बाजारपेठांमध्ये कांद्याची मागणी वाढली असून, नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये गेल्या आठ दिवसापासून कांद्याच्या दरांत सुधारणा होत असून आता अडीच हजारांवर थांबलेला कांदा गुरुवारच्या लिलावात किमान ५०० आणि कमाल ४२०० रुपयांपर्यंत गेला होतं. यामुळे शेतकऱ्यांना सरासरी ३५०० रुपयांपर्यंत दर मिळाला होता. दरम्यान, देशभरातील बाजारात कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पण त्यामुळे ग्राहकांना ५० रुपये किलो ह्या दराने कांदा खऱेदी करावा लागणार आहे. साधारणपणे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात नवीन कांड बाजारात येतो. पण यावर्षी पाऊस उशिरा व कमी प्रमाणात झाल्यामुळे कांड लागवडीलाही उशीर झाला. राज्यात अनेक भागात दीड महिना उशिरा कांदा लागवड झाल्याने काढणीसही उशीर झाला आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कांद्याच्या दरात काहीशी घसरण होण्याची शक्यता आहे. कारण तोपर्यंत नवीन कांदा बाजारात येण्यास सुरुवात होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. (Onion Rate)
Nashik News| भारती पवारांना दाखवले काळे झेंडे..? नेमकं प्रकरण काय?
अहमदनगर मधील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात सुधारणा होत असून, सोमवारी (दी. १६) रोजी झालेल्या लिलावात कमाल दर हा ३८०० रुपये क्विंटल इतका मिळाला होता. तसेच गुरुवारी (ता. १९) झालेल्या लिलावात कमाल दर हा ४२०० रुपयांपर्यंत गेला होता. अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर पहिल्यांदाच बाजारात कांद्याच्या दरात सुधारणा होताना दिसत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम