Maharashtra politics| बारामतीचे पवार काका- पुतणे येणार समोरासमोर…

0
15

Maharashtra politics|  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व त्यांचे पुतणे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे एका कार्यक्रमासाठी समोरासमोर येणार असल्याची माहिती समोर आली आहे. दौंड तालुक्यातील एका शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमा निमित्त हे दोन्ही नेते एक मंचावर येणार आहेत. यापूर्वीही एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलेले  असताना, त्यावेळी ही दोन्ही पवार काका-पुतणे एका व्यासपीठावर आले होते.

मात्र, अजित पवारांनी शरद पवारांना शिताफीने टाळलं होतं. त्यानंतर या दोघांनी पुण्यात एक गुप्तभेटदेखील घेतली होती अशी माहिती समोट आली होती. आता पुन्हा एकदा एका जाहीर कार्यक्रमामध्ये अजित पवार तसेच शरद पवार प्रमुख उपस्थितांमध्ये एक मंचावर असणार आहेत. २२ ऑक्टोबरला दौंड तालुक्यातील विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती असणार आहे. आणि यात आणखी विशेष म्हणजे बारामती मंतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळेदेखील कार्यक्रमाला उपस्थित असणार आहे.

Onion Rate| कांद्याच्या दरात दुपटीने वाढ; बळीराजाची दिवाळी होणार गोड…

खरंय की पुन्हा काकांची राजकीय गुगली 

अजित पवारांनी २ जुलै रोजी बंड करुन सत्तेत असणाऱ्या शिंदे – फडणवीस सरकारला समर्थन दिले होते. आणि त्यांच्यासोबत ४५ आमदार असल्याचंही सांगितलं जातं. तर यातील ९ जणांनी सत्तेत मंत्रिपदही घेतलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडलेली दिसत असतांनाही शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवारही फूट पडली नसल्याचं सांगत आहेत. काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली म्हणजे पक्षात फुट पडली असं म्हणता येत नाही, असं शरद पवार संगत आहेत. त्यामुळे यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय तरी काय? हे खरंच घडलंय की ही पुन्हा पवारांची कुठली राजकीय खेळी किंवा गुगली आहे, असा सामान्य जनतेला पडला आहे. त्यानंतर आता मात्र दौंड तालुक्यातील अनंतराव पवार इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी हे दोघे नेते उपस्थित असणार आहेत. सोबतच, विद्या प्रतिष्ठानच्या दौंडमधील स्वामी चिंचोली येथील शाळेच्या उद्घाटन कार्यक्रमातही दोघे नेते हजेरी लावणार असल्याची माहिती समोर येत आहे.

author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here