नाशिक: नाशिकच्या पिंपळगाव येथे महायुतीचे उमेदवार भारती पवार आणि हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत एका तरुणाने “कांद्यावर बोला” अशा जोरदार घोषणा दिल्या. थेट पंतप्रधानांचे भाषण सुरू असतानाच या तरुणाने घोषणाबाजी करणेची हिंमत केल्याने किरण सानप (Kiran Sanap) नावाचा हा तरुण चांगलाच चर्चेत आला.
तर, या सानपवरून आता नाशिकचे राजकीय वातावरण तापल्याचेही बघायला मिळाले. किरण सानप हा शरद पवार गटाचा कार्यकर्ता असून, त्याने आज शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. शरद पवार यांना काल पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला असता, त्यांनी या तरूणाचे कौतुक करत “तो जर आपला पदाधिकारी असेल. तर, आपल्याला त्याचा अभिमान असल्याचे म्हणत त्यांनी किरण सानपचे जाहीरपणे कौतुकही केले होते.
कदाचित मोदींनी कांद्यावर गरजेचे समजले नाही
नाशिक जिल्हा हा कांदा आणि द्राक्षाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, गेल्या वर्षभरापासून सरकारने कांदा निर्यातबंदी (Onion export ban) शेतकऱ्यांच्या माथी लादल्यामुळे आणि कांद्याला भाव मिळत नसल्याने नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. मात्र, ही भीषण परिस्थिती ठाऊन असून, आणि त्यातही कांद्याची प्रसिद्ध बाजारपेठ असलेल्या पिंपळगाव बाजार समितीत सभा घेत असतानाही कदाचित पंतप्रधान मोदींनी (PM Modi) आपल्या भाषणात कांद्याच्या मुद्द्यावर बोलणे फारकाही गरजेचे समजले नाही.
Onion Export Ban | ज्यांनी केली निर्यात बंदी; त्यांनाच करा मतदान बंदी!
शरद पवार आणि किरण सानप यांची भेट
दरम्यान, या सभेनंतर घोषणा देणारा किरण सानप हा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आयटी सेलचा पदाधिकारी असल्याचे फोटो आणि माहिती समोर आली होती. यावरुन भाजपने शरद पवार गटावर आरोपही केले होते. त्यानंतर आज किरण सानपने नाशिकमध्ये मुक्कामी असलेल्या शरद पवारांची हॉटेल एमरल्ड येथे भेट घेतली. त्यांच्या या भेटीची छायाचित्रे समोर आली असून, यात शरद पवार आणि किरण सानप यांच्यात बातचीत सुरु आहे.
Onion Export Ban | माझा ऊर भरून आला…
सभेतून पोलिसांनी मला ताब्यात घेतले. त्यांनी माझा फोन जप्त करून माझी चौकशीही केली. यानंतर मला रात्री उशिरा सोडले. विरोधक माझ्यावर टीका करत आहेत. कारण आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मी सभेत काही शरद पवारांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या नाही. मी २०१९ पासून राष्ट्रवादीमध्ये काम करतो. पण मी सभेत केवळ एक शेतकरी म्हणून गेलो होतो. तर, पवार साहेबांनी काल माझा अभिमान असल्याचे सांगितल्यामुळे माझा ऊर भरून आल्याची भावना किरण सानपने व्यक्त केली.
Onion Export | पिंपळगावला कांदा लिलाव सुरू; असा मिळतोय भाव
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम