Gold Silver Prices Down| दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सोने, चांदीचे दर घटले…

0
23
Gold Rate
Gold Rate

Gold Silver Prices Down| देशभरात सर्वत्रच दसरा हा सण वेगवेगळ्या प्रकारे आणि मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त असल्यामुळे अनेक जण दसऱ्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणात सोनं, चांदी खरेदी करतात. दसऱ्याच्या ह्या शुभमुहूर्तावर तुम्हीही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण, सोन्याच्या दरांत मोठी घसरण झाली आहे.

दसऱ्याच्या आदल्या दिवशीच सोन्याचे दर हे प्रतितोळा  तब्बल ६१ रुपयांनी घसरले आहे. सोन्याचा दर हा आज प्रतितोळा ६०,६३२ रुपयांवर पोहचला आहे. काल हा दर प्रतितोळा ६०,६९३ रुपये इतका होता.

तुमच्या शहरांत किती आहे दर..?

मुंबईमध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा भाव, सोमवारी (दी. २३) रोजी  ६१,४५० रुपये प्रतितोळा असा आहे. तर नागपूरमध्ये २४ कॅरेट सोनं ६१४५० रुपये प्रतितोळा इतका आहे. तसेच पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा भाव ६१,४५० रुपये प्रतितोळा असा आहे. सोलापुरात आज सोन्याचा भाव ६१,४५० असा आहे.

Horoscope Today 24 October: विजयादशमीच्या दिवशी कोणत्या राशींना लाभ होईल, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

असे आहेत चांदीचे दर…  

 चांदीचे दर देखील घसरले असून, १ किलो चांदीची दर हा ७५,१०० रुपये इतका आहे. मुंबई तसेच पुण्यातही आज चांदीचे दर ७५,१०० रुपये इतके आहेत.

इस्रायल आणि हमासमधील युद्धामुळे जागतिक बाजारांत मोठ्या घडामोडी सुरू आहेत. नुकतंच काही दिवसांपूर्वी सोने आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली होती. त्यामुळे सराफ बाजारांमध्ये शांतता दिसत होता. पण, आज दर कमी झाल्यामुळे तसेच सोबतच असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करायचं असल्याने नागरिकांनी आज बाजारांत चांगलीच गर्दी केली आहे. आज आणि उद्या असे दोन दिवस  सराफ बाजारांत चांगलीच गर्दी बघायला मिळण्याची शक्यता आहे.

चांदवड | देवीचं दर्शन घेऊन परतताना काळाने घातला घाला; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here