मनपातर्फे क्षयरोग शोध अभियान सुरू; शहरात सहा रुग्ण आढळले

0
10

नाशिक – शहरात मनपातर्फे क्षयरोग व कृष्ठरोग शोध अभियान सुरू असून यातील ६ रुग्णांना क्षयरोगाची लागण झाली आहे. तथापि या सर्व रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती मनपाकडून देण्यात आली आहे.

नाशिक महापालिकेतर्फे १३ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरपर्यंत क्षयरोग व कृष्ठरोग शोध अभियानांतर्गत तपासणी शिबीर सुरू आहे. ज्यात आतापर्यंत ५० हजारांहून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. यातील काही संशयितांची मनपा रुग्णालयांत तपासणी केली असता ६ रुग्णांना क्षयरोग झाला असल्याची माहिती मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली आहे.

या तपासणीसाठी १४६ पथकांची नियुक्त करण्यात आली आहे. ही पथके शहरातील विविध भागांमधील ४९ हजार घरांना भेटी देऊन सुमारे २.४२ लाख नागरिकांची तपासणी करणार आहेत. दरम्यान, पहिल्या तीन दिवसात ५० हजाराहून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील रोगाची लक्षणे दिसणाऱ्या संशयित रुग्णांची मनपाच्या रुग्णालयात मोफत एक्स-रे तपासणी व औषधोपचार सुरू करण्यात येत आहे. तसेच, या रुग्णांना निक्षय पोषण योजनेंतर्गत उपचार सुरू असेपर्यंत दरमहा ५०० रुपये देण्यात येत आहे.

दरम्यान, या मोहिमेस शहरातील नागरिकांनी सहभागी करावे, असे आवाहन मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार व वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी केले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here