Skip to content

आगामी सिंहस्थासाठी मनपा ६० किलोमीटरच्या बाह्य रिंगरोड विकसित करणार


नाशिक – आगामी २०२७-२८ मध्ये शहरात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने मनपा प्रशासनाने आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. या अंतर्गत मनपा ६० किलोमीटरचा बाह्य रिंगरोड विकसित करणार आहे.

यासाठी पालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवर यांनी तसा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश देण्याबरोबरच साधुग्रामसाठी जागेचा शोध घेऊन तिचे अधिग्रहण करण्याची सूचना यावेळी दिली आहे. यासोबत सिंहस्थासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांसंदर्भात प्राथमिक अहवाल सदर करण्याचे आदेशही यावेळी त्यांनी दिले आहे.

मनपा आयुक्तांनी नुकतीच सिंहस्थाच्या १४ अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या समन्वय समितीची बैठक आयोजित केली होती. त्यात आयुक्तांनी सिंहस्थापूर्वी पायाभूत सुविधांसाठी बांधकाम विभागाने आराखडा तयार करावा, नगररचना व मिळकत विभागाने आवश्यक असलेले भूसंपादन तसेच आरोग्य व वैद्यकीय विभागाने सेवेसंदर्भात प्राथमिक आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसीच गर्दीच्या नियोजनासाठी स्वतः आयुक्त लवकरच गोदाघाताची पाहणी करणार आहेत.

गेल्या सिंहस्थात तब्बल ९० किमीचा रिंगरोड बांधण्यात आला होता, ज्यात अनेक शहरातील विविध भागातील रस्ते मुख्य मार्गांच्या बाहेर विकसित केले होते. ज्याचा मोठा फायदा नाशिककरांना झाला होता. त्यामुळे मुख्य मार्गांवर होणारी गर्दीत घट झाली होती व अजूनही अवघ्या कमी वेळात विनाअडथळा शहराच्या कुठल्याही भागातून सहज पोहोचत आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!