Nilesh Rane | टिका करणे राणेंना भोवले; ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून तूफान दगडफेक

0
41
Nilesh Rane
Nilesh Rane

Nilesh Rane |  भाजपमधील राणे कुटुंबीय हे नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणांमुळे चर्चेत असतात. कधी त्यांच्या वादग्रस्त वकतव्यांमुळे तर कधी त्यांच्या टीकांमुळे. दरम्यान, आता भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली आहे. कोकणात हा राजकीय राडा पाहायला मिळाला. गुहागर येथे ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्ते तथा राणे कुटुंबीयांचे समर्थक हे एकमेकांना भिडले होते. (Nilesh Rane)

ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजप नेते तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या सभेचे आज गुहागर येथे आयोजन करण्यात आले होते. मात्र, हा गुहागर संघ ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांचा आहे. गुहागरमध्ये झालेल्या ठाकरे गट आणि राणे समर्थकांमधील हा राडा इतका मोठा होता की, यात पोलिसांना बाळाचा वापर करावा लागला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांचा गुहागर हा मतदारसंघ असून, भास्कर जाधव यांनी केलेल्या टीकेला आपण त्यांच्या मतदारसंघात जाऊन आणि जाहीर सभा घेऊन उत्तर देऊ, असं चॅलेंज भाजप नेते निलेश राणे यांनी दिलेलं होतं.(Nilesh Rane)

Maratha Reservation | नशिकचे आमदार ढिकलेंच्या घराबाहेर मराठा समाजाचे आंदोलन

Nilesh Rane | शाब्दिक वाद रस्त्यावर उतरला 

त्यानंतर या दोन्ही पक्षांमध्ये आणि नेत्यांमध्ये शाब्दिक वाद सुरु होता. दरम्यान, आज हा वाद चांगलाच पेटला असून, या शाब्दिक वादाचे रूपांतर या राड्यात झाले. तर, आज सभेसाठी निलेश राणे हे गुहागरमध्ये दाखल झाले असता, त्यांच्या ताफ्यावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी तूफान दगडफेक केली.(Nilesh Rane)

त्यामुळे या परिसरात मोठी खळबळ उडाली. आणि तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि जमावाला पांगवण्यासाठी यावेळी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, परिसरात आता तणावपूर्ण शांतता पसरली आहे. या हल्ल्यात राणे यांच्या ताफ्यातील वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. (Nilesh Rane)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here