Nikhil Wagle | …पण निखिल वागळेंनी ऐकलं नाही; पोलिसांनी सांगितलं नेमकं काय झालं..?

0
27
Nikhil Wagle
Nikhil Wagle

Nikhil Wagle |  शुक्रवारी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या ‘निर्भय बनो’ या कार्यक्रमाचे आयोजन पुण्यात करण्यात आले होते. मात्र, निखिल वागळेंच्या गाडीवर काही भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला. गाडीच्या काचा फोडल्या आणि शाईफेकही केली. यावेळी या गाडीत निखिल वागळे आणि वकील असिम सरोदे हे होते. या हल्ल्यातून हे दोघेही बचावले. त्यानंतर ते कार्यक्रमस्थळी आले आणि भाषणही केले. दरम्यान, या घटनेच्या दुसऱ्या दिवशी यात नेमकी चूक कोणाची..?आणि काय चुकले? याबाबत पुणे पोलिसांकडून याबाबत महिती देण्यात आली. (Nikhil Wagle)

Nikhil Wagle | काय म्हणाले पोलिस..?

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी एक वादग्रस्त पोस्ट टाकली होती. त्यामुळे पुण्यातील वातावरण हे तापलेले होते. दारम्यान, निखिल वागळे हे पुण्यात आल्यानंतर पोलीस अधिकारी हे त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांना शहरातील वातावरणाबद्दल माहिती दिली. तसेच त्यांना आम्ही सल्ला देत नाही, तोपर्यंत तुम्ही कार्यक्रमस्थळी जाऊ नये, असे सांगितले होते.

कारण या कार्यक्रमस्थळाच्या आजूबाजूला मोठ्या संख्येने आंदोलक एकत्र जमलेले होते. दरम्यान, पोलिसांकडून आंदोलकांच्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच त्यांनी कार्यक्रमस्थळी जावे, असे त्यांना सांगण्यात आले होते. सुमारे २५ आंदोलकांच्या संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ताब्यात घेण्यात आले होते. तर, आणखी काही जणांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू होती.(Nikhil Wagle)

Nikhil Wagle | ज्येष्ठ पत्रकार निखील वागळेंच्या गाडीवर का झाला हल्ला..?

पोलिसांनी समजावले, मात्र… 

जोपर्यंत आम्ही संपूर्ण परिसर सुरक्षित करत नाही. तोपर्यंत काही काळ थांबण्यासाठी पोलिसांनी त्याला समजावले होते. मात्र, तरीही त्यांनी जाण्याचा आग्रह धरला. रस्त्यांवरील अवजड वाहनांमुळे आंदोलकांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया मंदावली होती. तर, बळाचा वापर करणे हे कठीण होत असल्याचीही माहिती त्यांना दिलेली होती. तरीही आमच्या सल्ल्याविरुद्ध जाऊन ते घटनास्थळी गेले आणि प्रत्यक्षात मार्ग बदलून त्यांनी पोलिसांना चकमा दिला. मात्र, तरीही आमच्या साध्या वेशातील माणसे हे त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या गाडीच्या मागे लागलेले होते.(Nikhil Wagle)

Chhagan Bhujbal | दादांना मुख्यमंत्री करायचंय; भुजबळांचा पवारांना थांबण्याचा सल्ला

आंदोलक व गाडी यात साध्या वेशातील पोलीस

ज्यावेळी वागळे यांच्या गाडीवर हल्ला झाला. त्यावेळी आंदोलक व गाडी यांच्यामध्ये आमचे साध्या वेशातील पोलीस होते. पण मोठ्या प्रमाणातील रहदारी असल्यामुळे त्यांना व त्यांच्या गाडीला तात्काळ बाहेर काढणे हे शक्य झाले नाही. या घटनेत सहभागी असलेल्यांच्या विरोधात दंगल, आणि मालमत्तेचे नुकसान इत्यादी कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे. तसेच पुणे शहर पोलिसांकडून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन यावेळी पोलिसांनी दिले.(Nikhil Wagle)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here