सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | विजयनगर (ता. देवळा) येथे आज महिला वर्गासाठी हळदि कुंकु कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम आज मोठ्या उत्साहात पार पडला. तसेच महिला वर्गाचा मोठा प्रतिसादही या कार्यक्रमाला मिळाला. यानिमित्ताने भारती पवार आणि सुनंदा निकम यांनी काढलेल्या भव्य अशा आकर्षक रांगोळीने उपस्थित महिला वर्गाचे लक्ष वेधून घेतले होते. विजय नगर येथील पोलीस पाटील अनिता आहेर यांनी या हळदि कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी उपस्थित महिला भगिनींना वाण देऊन सौभाग्य वाढीसाठी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.(Deola)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम