Deola | नमो चषकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव – आ. राहुल आहेर

0
69
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | ‘नमो चषक’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना क्रीडा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळाले. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धात उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवून कला, गुण अवगत केले. ही तालुक्याच्या दृष्टिकोनातून अभिमानास्पद बाब असून, यांच्यातून निश्चितच उद्याचे चांगले खेळाडू, कलाकार तयार होणार असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. राहुल आहेर यांनी आज देवळा येथे आयोजित ‘नमो चषक’ या कार्यक्रम दरम्यान केले .

आज देवळा येथे मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. तसेच देवळा तालुका नमो चषक स्पर्धेचे पारितोषिक वितरण हे आ. डॉ. राहुल आहेर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. आ. राहुल आहेर यांच्या हस्ते नमो चषकात सहभागी विद्यार्थ्यांना तसेच मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Deola | खुंटेवाडी प्राथमिक शाळेला माजी विद्यार्थ्यांकडून साऊंडसिस्टीम भेट

यावेळी नगराध्यक्षा भाग्यश्री पवार, उपनगराध्यक्ष मनोज आहेर, माजी नगराध्यक्षा ज्योत्सना आहेर, गटनेते संजय आहेर, भाजपा तालुका अध्यक्ष अतुल पवार, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष योगेश आहेर, नरसेवक जितेंद्र आहेर, अशोक आहेर, करण आहेर, दिलीप आहेर, हितेश आहेर, कैलास पवार, डॉ. ललित मेतकर, प्रवीण मेधणे आदिंसह ग्रामस्थ मोठ्या उपस्थित होते. सूत्रसंचालन भगवान आहेर यांनी केले. आभार योगश आहेर यांनी मानले .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here