सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | खुंटेवाडी ता.देवळा येथील प्राथमिक शाळेचे माजी विद्यार्थी असलेल्यांनी शनिवार (दि .१०) रोजी गावातील प्राथमिक शाळेला साऊंडसिस्टीम भेट देत शाळेबाबत कृतज्ञता व्यक्त केली. बाजार समितीचे संचालक व माजी सरपंच भाऊसाहेब पगार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात हा शाळार्पण सोहळा संपन्न झाला. अध्यक्षस्थानी सरपंच ठगुबाई पवार या होत्या.
येथील प्राथमिक शाळेचे बहुतांश विद्यार्थी हे शिक्षक व सैनिक म्हणून कार्यरत आहेत. वाढदिवसानिमित्त शाल, केक, भेटवस्तू यांऐवजी गाव-शाळा-समाजासाठी काही देता आले तर तसे उपक्रम राबवा असे आवाहन भाऊसाहेब पगार यांनी केले असता शाळेस मोठी साऊंडसिस्टीम भेट देण्यात आली. यामुळे परिपाठ घेणे, नृत्य-नाट्य-गायन व इतर कार्यक्रम घेण्यासाठी शाळेला या साहित्याची मदत होणार आहे. यावेळी शैक्षणिक उपक्रमांबाबत चर्चा झाली तसेच उल्लेखनीय काम व अध्यक्ष चषक स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा श्रद्धा फाउंडेशनच्या वतीने शालेय साहित्य भेट देत गौरव करण्यात आला.
Chhagan Bhujbal | विणकरांसाठी मंत्री छगन भुजबळ मैदानात; केली ही मागणी
यावेळी देवळा महाविद्यालयाचे उपप्राचार्य बापू रौदळ, केंद्रप्रमुख उखा सावकार, अर्चना काकडे, भाऊसाहेब पगार यांनी मनोगते व्यक्त करत उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी उपसरपंच संजय भामरे, सदस्य वैशाली जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे योगेश भामरे, गणेश भामरे, आश्लेष भामरे, निवृत्त पोलीस निरीक्षक प्रल्हाद भामरे, माजी सैनिक जिभाऊ खैरणार, सतीश भामरे, शांताराम जाधव, निवृत्त बँक निरीक्षक सतीश पाटील, सुभाष पगार, बापू पवार, जिभाऊ भामरे, अशोक सावकार, मनेश गवळी, पोस्टमास्तर भिलाजी भामरे, दीपाली भामरे, मुख्याध्यापक रत्नमाला गांगुर्डे, देवाजी निकम, संजय भामरे यांच्यासह शिक्षणप्रेमी नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोठाभाऊ पगार यांनी केले तर बाजीराव निकम यांनी आभार मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम