New Rule | ‘हिट अँड रन’च्या कायद्यात होणार बदल! काय आहे नविन कायदा?

0
17
New Rule
New Rule

New Rule | गेल्या काही दिवसांपुर्वी राज्यासह देशात ट्रॅंकर चालकांच्या संपामुळे खळबळ उडाली होती. संपुर्ण राज्यभरात करण्यात आलेल्या संपामुळे अचानक इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम होत इंधन भरून घेण्यासाठी नागरिकांनी पेट्रोल पंपांवर गर्दी केल्याचं दिसून आलं. केंद्र सरकारच्या गृह खात्याच्या मध्यस्थीनंतर केंद्र सरकारच्या हिट अँड रनचा नवीन कायद्यात बदल केला जावा अशी मागणी ट्रॅंकर चालकांकडून करण्यात येत होती.

आता या संदर्भात एक मोठी अपडेट समोर येच असून, केंद्र सरकारच्या ‘हिट अँड रन’च्या (Hit and Run) नवीन कायद्याला देशभरातील ट्रक चालकांनी विरोध केला असताना या पार्श्वभुमीवर अशावेळी अपघाताची जबाबदारी मालकावर टाकण्याचा प्रस्ताव राज्याच्या परिवहन विभागाने तयार केलेला आहे. आता या पद्धतीचा कायदा आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

Petrol Shortage | अखेर संप मागे; मात्र दोन दिवसांत राज्याला ५०० कोटींचा फटका

या नविन कायद्यानुसार, खासगी लक्झरी बसला अपघात झाला असल्यास मालकही दोषी ठरणार असून भीषण अपाघात झाल्यास त्याची जबाबदारी बस चालकासोबतच मालकावरही टाकणार असा प्रस्ताव परिवहन विभागाने केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला आहे. मात्र सध्या या प्रस्तावावरुन वाद निर्माण होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या नवीन बस वाहन कायद्यात मालकावर जबाबदारी टाकल्यानंतर बस सुस्थितीत राहणार असून देशातील अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकतात, अशी शक्यता परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी वर्तवलेली आहे.

Chandwad | ‘नमो चषक’ स्पर्धांमध्ये चांदवड तालुक्याला दुय्यम स्थान.

New Rule | अपघात झाल्यास गाडी चालकालाच दोषी न ठरवता मालकाला देखील दोषी ठरवा..

राज्यासह पूर्ण देशभरात आतापर्यंत बसच्या अपघाताला केवळ गाडीच्या चालकालाच दोषी ठरवले जात होते मात्र अनेकदा गाडीतील बिघाड, ओव्हरलोडेड गाडी चालकाला चालवण्यास मालक वर्ग हे भाग पाडत असतात. त्यामुळे अपघात झाला तर केवळ गाडी चालकालाच दोषी न ठरवता मालकाला देखील दोषी ठरवले जाणार असल्याचा नविन कायदा येऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या परिवहन विभागाने तयार करून मंजुरीसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडे पाठवलेला आहे. या कायद्यात आता काय काय बदल केले जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here