NDCC bank: जिल्हा बँक वाचवा, खा. हेमंत गोडसेंचे सहकार मंत्र्याना पत्र

0
42

NDCC bank: शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन केलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला उर्जितावस्थेत आणण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी दिल्ली दरबारी प्रयत्न सुरू केले आहेत. शेतकऱ्यांसाठी जिल्हा बँक एक वरदान असून आर्थिक वाहिणी असून ती पुन्हा सुरू होण्यासाठी केंद्राने हस्तक्षेप करावा असे आवाहन देखील गोडसे यांनी केले. विविध कारणांमुळे बँक अडचणीत आल्याने बँकेकडून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा कर्जपुरवठा होत नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. (NDCC bank)

Anukampa job: अनुकंपा भरतीत राज्यात नाशिकचाच डंका; उमेदवारांनी मानले मंत्री भुसेंचे आभार

नाशिक जिल्ह्यातील महत्वाची संस्थाच अंतिम श्वास घेत असल्याने शेतकरी पुरता बेजार झाला आहे. शेतकरी आणि ठेवीदार यांना दिलासा देण्यासाठी बँकेला गतवैभव पुन्हा प्राप्त होणे अत्यंत गरजेचे आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ज्या आक्षेपामुळे अडचणीत आली ते आक्षेप शिथिल करावेत अशी कळकळीची विनंती खा. हेमंत गोडसे यांनी केंद्रिय सहकार मंत्री नामदार ज्ञानेश कुमार यांना घातले आहे.

जिल्हा बँक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गेल्या काही वर्षांपासून नासिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अडचणीत आलेली आहे.त्यामुळे शासनाने जिल्हा सहकारी बँकेवर प्रशासक नेमलेले आहेत.बँक प्रशासनाच्या काही चुका आणि हलगर्जीपणामुळे आज मितीस बँक आर्थिकदृष्ट्या खूपच पिछाडीवर गेलेली आहे.याचा फटका जिल्हयातील हजारो शेतकऱ्यांना


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here