NCP | राष्ट्रवादीच्या निवडणूक आयोगाच्या निकालात नवा ट्विस्ट

0
24

 

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]

NCP | राज्याच्या राजकारणात काल एक मोठी राजकिय घडामोड झाली असून, केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचे नाव आणि घड्याळ हे अजित पवार गटाला बहाल केले. दरम्यान, या प्रकरणात आता आणखी एक मोठा ट्विस्ट आला आहे. आणि हा मुद्दा या ‘पवार विरुद्ध पवार’ या लढ्यात महत्त्वाचा ठरणार आहे. (NCP)

Maharashtra Goverment | शिंदे सरकारचे ‘२०’ धडाकेबाज निर्णय

NCP |संख्याबळाच्या आधारावर निकाल

काल संध्याकाळी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या प्रलंबित प्रकरणावर एक मोठा आणि महत्त्वाचा निकाल दिला. हा निकाल निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्यां गटाच्या बाजूने दिला आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगाच्या निकालाची ऑर्डरदेखील समोर आली असून, विधीमंडळातील संख्याबळाच्या आधारावरच हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. (NCP)

Malegaon | राणेंनी ‘मिनी पाकिस्तान’ म्हटल्यावर नामदार भुसे आक्रमक भूमिका का घेत नाही?

तसेच, या निकालातून आणखी एक महत्त्वाची गोष्ट समोर आली असून, यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही लोकप्रतिनिधींनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना पाठिंबा दिला आहे. तर, या संबंधित लोकप्रतिनिधींनी निवडणूक आयोगात दोन्ही पवारांच्या गटांच्या बाजूने प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. दरम्यान, हा मुद्दा आता राष्ट्रवादीच्या आगामी न्यायालयीन लढ्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. (NCP)

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाच्या ऑर्डरमधून एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 5 आमदार आणि 1 खासदार यांनी दोन्ही गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. याबाबत अजित पवार यांनादेखील प्रश्न विचारण्यात आला आहे. या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार काहीसे गडबडले. पण त्यांनी थोडक्यात प्रतिक्रिया दिली. याबाबतचा निकाल देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. निवडणूक आयोगाने योग्य तो निर्णय घेतला आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

निवडणूक आयोगाने ‘या’ आधारांवर अजित पवारांना पक्ष केला बहाल

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा निकाल हा विधीमंडळाच्या संख्याबळाच्या आधारावर देण्यात आला आहे. अजित पवार गटाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांच्याकडे विधीमंडळातील जास्त संख्याबळ आहे. प्रतिज्ञापत्राच्या तपासणीनंतर आयोग असा निर्णय घेते की, अजित अनंतराव पवार यांना राष्ट्रवादी पक्ष, घड्याळ चिन्हं देण्यात येते. अजित पवार गटाकडून 41 आमदारांचं प्रतिज्ञापत्र तर शरद पवार गटाकडून 15 आमदारांचं प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगात सादर करण्यात आली होती.

विशेष म्हणजे 1 खासदार आणि 5 आमदारांनी दोन्ही गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र दिलं. अजित पवार गटाला 2 खासदारांच्या समर्थनाचं प्रतिज्ञापज्ञ देण्यात आलं. तर शरद पवार गटाच्या बाजूने 4 खासदारांच्या समर्थनाचं प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगात देण्यात आलं.

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उद्या दुपारी चार वाजेपर्यंत 3 नावं आणि चिन्हं सूचवा, असे आदेश निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला दिले आहेत. शरद पवार गटाने उद्या दुपारपर्यंत नाव न दिल्यास राज्यसभा निवडणुकीत त्यांच्या उमेदवारांना अपक्ष मानलं जाईल, असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here