NCP Ajit Pawar | अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार जाहीर; ‘या’ नेत्यांना मिळाले एबी फॉर्म

0
12
#image_title

NCP Ajit Pawar | विधानसभा 2024 निवडणुकीसाठी आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. काल दि. 20 ऑक्टोबर रोजी भाजपकडून विधानसभेसाठी 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. यानंतर आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काही उमेदवार जाहीर केले आहेत. या उमेदवारांना पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते एबी फॉर्म देण्यात आले आहेत.

Ajit Pawar | अजित पवार ‘या’ मतदार संघातून निवडणूक लढवणार!; प्रचाराच्या बॅनरने चर्चांना पूर्णविराम

हिरामण खोसकर यांना उमेदवारी जाहीर

यामध्ये विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी-त्रंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माजी आमदार हिरामण खोसकर यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. खोसकर यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवारांचे राष्ट्रवादी प्रवेश केला होता. यानंतर आज त्यांना इगतपुरी-त्रंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

दिंडोरी मतदार संघातून नरहरी झिरवाळांना उमेदवारी जाहीर

तसेच, दिंडोरी मतदारसंघातून विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर नवापूर मतदार संघातून भरत गावित यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भरत गावित हे पूर्वी भाजपात होते, मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Ajit Pawar | इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचा उमेदवार ठरला?; त्र्यंबकेश्वर येथील सभेत अजित पवारांची अप्रत्यक्ष घोषणा?

या नेत्यांना देण्यात आले एबी फॉर्म

चेतन तुपे

संजय बनसोडे

राजेश विटेकर

दिलीप वळसे पाटील

सुनील टिंगरे

राजेश पाटील

दौलत दरोडा

हिरामण खोसकर

दत्तात्रय भरणे

आशुतोष काळे

राजेश पाटील

छगन भुजबळ

बाबासाहेब पाटील

भरत गावित

अतुल बेनके


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here