Navratri | नवरात्रीमध्ये उपवास करताय? मग तुमचा आहार कसा असावा?

0
2

Navratri | जर तुम्ही नवरात्रीमध्ये उपवास करणार असाल तर तुमची जीवनशैली धावपळीची असेल तर तुम्ही दिवसभरात किमान नारळपाणी प्यायला हवे. उपवासाच्या दिवशी किमान दोन फळे खाणेदेखील आवश्यक आहे. भारतात हिंदू सण-उत्सवांना खूप महत्त्व आहे. कित्येक सण साजरे करताना लोक उपवास-व्रत करतात. बहुतांश उपवास हे सहसा एका दिवसाचे असतात. पण नवरात्रीमधील उपवास सलग नऊ दिवसांचे असतात. यामुळे अशा वेळी उपवास करताना काय काळजी घ्यायची? आहार काय असावा? काय खावं, काय खाऊ नये याबाबत अनेक प्रश्न पडत असतात. याच प्रश्नांची उत्तरे आम्ही तुम्हाला देणार आहोत…(Navratri)

Nashik | नवीबेजच्या उपसरपंचपदी मधुकर वाघ यांची बिनविरोध निवड

हा उपवास का केला जातो?

प्रथम उपवास का केला जातो हे समजून घेउया. आपले मन, मेंदू व मनगट हे एकत्रितपणे काम करत असतात. त्यामुळे तुमच्यामध्ये सात्त्विकता यावी यामुळे उपवास केला जातो. तुमचे जास्तीत जास्त लक्ष केंद्रित व्हावे यासाठी उपवास करायचा असतो. तुम्ही मनात आणि मेंदूमध्ये सुरू असलेल्या विचारांशी जास्तीत जास्त जोडले जावे हा उपवास करण्याचा मुख्य हेतु असतो. त्यामुळे तो उपवास करताना जर तो सात्त्विक पद्धतीने केला जाणार असेल तरच तो करावा.

उपवासामध्ये काय खावे?

उपवासाच्या दिवशी आहारात समाविष्ट केला जाणारा एक पदार्थ म्हणजे तेलबिया आणि तो म्हणजे शेंगदाणे यांचा समावेश केला पाहिजे. मखानाचा समावेश आवर्जून तुमच्या आहारात करायला पाहिजे. कारण तुमच्या शरीरासाठी आवश्यक कॅल्शियम, प्रथिने आणि विविध प्रकारची खनिजे शेंगदाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात असतात. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की, शेंगदाणे उपवासाला चालतात का? तर होय शेंगदाणे उपवासाला चालतात. त्यामुळे उपवासाला तुम्ही शेंगदाण्याचे सेवन करू शकता.  दूध, दही हे पदार्थ देखाल तुम्ही खाऊ शकता; पण नवरात्रीचे उपवास करताना बिया आणि फळांचे सेवन करण्यावर जास्त भर दिला गेला पाहिजे.

Nashik | आमदार खोसकर आले अडचणीत; नाशकात चर्चाना उधाण.. नेमकं काय घडलं?

नारळपाणी-

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपवास करताना दिवसभरात नारळपाण्याचे सेवन करावे आणि जर ते शक्य झालेच नाही. तर तुम्ही दिवसभरात जे पाणी पितात त्यामध्ये तुळशीचे पान टाकून प्यायला हवे. तर तुमचे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होइल. मात्र, तुम्हाला जर मधुमेह किंवा रक्तदाबासारखे आजार असतील, तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी तपासूनच उपवास करावा.

भगर –

मधुमेही असाल आणि उपवास करताना जर भगर खात असाल. तर तुम्ही त्याचा आहारात समावेश करू शकतात. भगर आणि शेंगदाण्याची आमटी उपवास करताना खाऊ शकतात. ते आरोग्यासाठी उत्तम असतं. तसेच उपवासाचे थालीपीठ तयार करता येऊ शकतात. त्यातसुद्धा भगरीचे पीठ वापरले जाते किंवा त्यात शेंगदाण्याचा कूट वापरला जातो. तुम्ही हे पदार्थ उपवासासाठी खाऊ शकता.

रताळे –

रताळेदेखील आरोग्यासाठी खूप चांगले असते. कारण त्यात B-12 असते. पण उपवासासाठी रताळे शक्यतो उकडून सेवन करावे.

चहा किंवा कॉफी –

उपवासाच्यादिवशी चहा आणि कॉफीचा त्याग करावा लागेल कारण हे दोन पदार्थ उपवसाला उत्तेजित करत असतात.  म्हणजे चहा, कॉफीमध्ये असणारे टॅनिन आणि कॅफिन हे शरीरातील रक्तदाब वाढवते आणि भूक मंदावत असते. चहा आणि कॉफी तामसी-राजसी आहारातील पदार्थ आहेत. त्यामुळे ते उपवसाच्या दिवशी तुमच्या आहारातून काढून टाकायला हवेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here