Nashik | देवळा तालुक्यातील नवीन शेतकरी वंचित राहण्याची शक्यता नाही तर 100 टक्के वंचितच राहतील. अशी चर्चा आता व्हायला सुरुवात झालेली आहे. कारण नवीन शेतकरी अजून पर्यंत aproval झालेले नाही. ज्या शेतकरी बांधवांनी PM किसान योजनेसाठी ऑनलाईन रेजिस्ट्रेशन केलेले आहेत. त्यांचे अप्रूवल मागील बऱ्याच कालावधीपासून पूर्ण झालेले नाही. पूर्वी हा विषय महसूल विभागाकडे आहे किंवा कृषी विभागाकडे आहे असे वाद सुरू होते. नंतर या सगळ्यावर उपाय म्हणून शेवटी हे कृषी विभागाकडे हे काम देण्यात आले आहे. पण कृषी अधिकाऱ्यांशी PM किसानचा मागचा हफ्ता येण्याआगोदर चर्चा केली. तेव्हा त्यांनी असे सांगितले की अजुन लॉगिन आयडी आणि पासवर्ड आलेले नाहीत. त्यासाठी माहिती पाठवलेली आहे. असे उत्तर कृषी अधिकाऱ्यांनी दिले. मात्र अद्यापही नवीन शेतकऱ्यांचे aproval झालेले नाही त्यांमुळे ते या योजनेतून सुद्धा वंचितच राहू शकतात. अशी माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे यांनी दिलेली आहे.(Nashik)
Nashik | नवीबेजच्या उपसरपंचपदी मधुकर वाघ यांची बिनविरोध निवड
या संदर्भातील माहिती जयदीप भदाणे यांनी दिलेली आहे. त्यात त्यांनी असे देखील नमूद केलेले आहे की महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या लभार्त्यांकडे PM किसान योजनेचे पत्र असतील त्यांनाच ह्या योजनेचा लाभ मिळेल. तसेच ते पुढे असे देखील म्हणाले आहेत की, या सर्व बाबींमुळे मा. तहसीलदार साहेब आणि लोकप्रतिनिधी यांनी यात तात्काळ लक्ष घालून आपल्या तालुक्यातील शेतकरी बांधवांना तात्काळ न्याय मिळवून द्यावा ही विनंती देखील त्यांनी केलेली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम