Skip to content

Nashik | नवीबेजच्या उपसरपंचपदी मधुकर वाघ यांची बिनविरोध निवड


Nashik| कळवण तालुक्यातील नवीबेज ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मधुकर बारकू वाघ यांची बिनविरोध निवड झाली आहे. विद्यमान उपसरपंच पूनम खैरनार यांनी आवर्तनपद्धतीने राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी सोमवारी (दि.९) रोजी ग्रामपंचायतीच्या सभागृहात निवडणुकीनिर्णय अधिकारी अविनाश पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. यावेळी विहित मुदतीत उपसरपंचपदासाठी मधुकर वाघ यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. या अर्जावर सूचक म्हणून प्रवीण गांगुर्डे आणि अनुमोदक म्हणून सुनील गांगुर्डे यांनी स्वाक्षऱ्या केल्या. एकमेव अर्ज आल्याने मधुकर वाघ यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.

Nashik | आमदार खोसकर आले अडचणीत; नाशकात चर्चाना उधाण.. नेमकं काय घडलं?

या विशेष सभेसाठी सरपंच रुपाली गांगुर्डे, सदस्य मानसी खैरनार, सचिन गांगुर्डे, उषा गोधडे, स्मिता पवार, कमाल पवार, निलेश पवार, लता सोनवणे आदी उपस्थित होते. या निवडप्रसंगी पॅनलचे नेते कळवण कृउबा सभापती धनंजय पवार, डॉ. वसंत गांगुर्डे, प्रवीण महाजन,प्रभाकर खैरनार, चंद्रकांत पवार, माणिक देवरे, माणिक निकम, हरिदास बागुल, बापूसाहेब खैरनार, नितीन पवार, योगेश खैरनार, योगेश बच्छाव, पिनूनाना खैरनार, विशाल वाघ, दीपक खैरनार, शिवाजी वळींकर, चेतन खैरनार, सतीश खैरनार, हरिभाऊ वाघ, अंकुश माळी, विलास पवार, रमेश खैरनार, जगणं खैरनार, केदा जगताप, विश्वनाथ अहिरराव, शामराव खैरनार, रमेश वळींकर, प्रकाश खैरनार, वसंत खैरनार, ललित पगारे, गोरख वाघ, मुन्ना खैरनार, राकेश गांगुर्डे, अरुण खैरनार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Election | टाकेद ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीत सदस्यपदी ‘गंगुबाई बगड’ बिनविरोध


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!