Nashik Voilence | नाशकात ५ तास दंगलीची धग, नागरिकांचा जीव मुठीत; नेमकं काय घडलं..?

0
85
Nashik Voilence
Nashik Voilence

 Nashik Voilence | काल नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने बांग्लादेशमधील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बंद पुकारण्यात आला होता. या बंदला गालबोट लागले आणि शहरातील जून नाशिक परिसरात हिंसक वळण लागले. दुपारी दूध १.४७ वाजता दूधबाजाराजवळील मशिदीसमोर दोन गटांत वाद झाले आणि काही मिनिटांतच त्याचे लोण संपूर्ण जुन्या नाशिकमध्ये पसरले. दुपारी सुरू झालेल्या या वादानंतर सायंकाळी ६.५४ वाजेपर्यंत या भागात ठिकठिकाणी दगडफेक सुरू होती. अचानक दगडांचा वर्षाव सुरू झाल्याने सामान्य नागरिकांची चांगलीच पळापळ झाली आणि शहरात भीतीचे वातावरण निर्माण दगडफेक होत असल्याने नागरिक जागा मिळेल तिथे जीव मुठीत घेऊन लपत होते. (Nashik Voilence)

बडी दर्गा, चव्हाटा, काझीपुऱ्यापासून ते शालिमार या संपूर्ण भागात दहशतीचे वातावरण होते. रस्त्यावरील घरांवरही दगडफेक झाली. खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या. तर अनेक ठिकाणी घरांमधूनही दगडफेक झाल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत जुन्या नाशकात तणावाचे वातावरण होते आणि चोख पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करून संचारबंदी लागू करण्यात आली होती.(Hindu-Muslim violence)

Nashik News | नाशिकमध्ये तणावपूर्ण स्थिती, पालकमंत्री ॲक्शन मोडवर; प्रशासनाला सक्त निर्देश

दगडफेक पूर्वनियोजित होती..?

दरम्यान, ही दगडफेक पूर्वनियोजित होती. असे येथील काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांचे म्हणणे आहे. कारण अनेक घरांमधूनही दगडफेक झाल्याने या घरांमध्ये आधीच एवढे दगड आले कुठून असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

 Nashik Voilence | नेमकं काय घडलं..?

सुरुवातीला दूधबाजार परिसरात मोठ्या संख्येने जमलेल्या एका जमावाकडून घोषणाबाजी सुरू असताना दुसरीकडे साक्षी गणेश मंदिर परिसरात जमलेल्या दुसऱ्या जमावाकडूनही हातात भगवे झेंडे घेऊन घोषणाबाजी सुरू होती. याठिकाणी पोलिसांकडून बॅरिकेड्स आणि बंदोबस्त तैनात करत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जात असतानाच दुसरीकडे बडी दर्गा आणि म्हसरुळ टेक परिसरात दोन्ही गटांकडून तूफान दगडफेक केली जात होती.

तर, बडी दर्गा परिसरात पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली असून, पोलिस उपायुक्तांसह आणखी पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्या फोडत जमावाला पांगवण्यासाठी प्रयत्न झाले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने राखीव दल आणि अतिरिक्त फोर्सला पाचारण केले.  वातावरण शांत झाल्यानंतर या परिसरात दगड, विटा, मोठ्या प्रमाणावर काचेच्या बाटल्याचा खच पडला होता. या दगडफेकीत नागरिकांच्या वाहनांची, घरांच्या खिडक्या इत्यादींची मोठी तोडफोड करण्यात आली होती. यामुळे परिसरात महिला, नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.(Nashik News)

Nashik News | नाशकात सकल हिंदू समाजाच्या मोर्चादरम्यान राडा; शहरात तणावाची परिस्थिती

३० ते ४० जणांवर गुन्हे दाखल 

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, यात दिसत असलेल्या सर्वांना अटक केली जाईल, आतापर्यंत ३० ते ४० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, यापैकी १५ ते २० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ६ गुन्हेही दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिली. काल रात्रभर पोलिसांचा मोठा बंदोबस्त या भागात तैनात होता आणि संचारबंदीही लावण्यात आली होती. यानंतर आजही या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.

पोलिस उपायुक्तांसह अधिकारी गंभीर जखमी 

बुधवार पेठ, बडी दर्गा परिसरात पोलिस अधिकारी खांडवी हे दोन्ही बाजूच्या जमावापुढे उभे राहून त्यांना शांतता राखण्याचे आवाहन करत होते. मात्र अचानक दोन्ही बाजूने दगडफेक सुरू झालयाने जमावाला पसरवण्यासाठी त्यांनी जमावाच्या दिशेने अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. मात्र त्यातील एक दगड खांडवी यांच्या छातीत लागल्याने ते जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.(Nashik Voilence)

पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांना दोन्ही गटांतील तरुणांनी घेराव घातला आणि पोलिस का कमी आहेत. दंगल उसळलीच कशी? असे आरोप करत जाब विचारण्यास सुरुवात केली. एकीकडे बच्छाव नागरिकांना समजावून सांगत असतानाच अचानक दगडफेक सुरू झाली आणि यात एक दगड हा बच्छाव यांच्या कानाला ते गंभीर जखमी झाले आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here