Nashik Teachers Constituency | राज्यात सध्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघांच्या निवडणुका पार पडत असून, नाशिक शिक्षक मतदार संघाचाही यात समावेश आहे. या पार्श्वभूमीवर आज नाशिक येथे महायुतीच्या (Mahayuti) जिल्ह्यातील सर्व नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. दरम्यान, या बैठकीसाठी पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse), भाजप आमदार राहुल ढिकले (Rahul Dhikle), देवयानी फरांदे (Devyani Pharande), माजी खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) हे उपस्थित होते. मात्र, जिल्ह्यातील अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी बैठकीला दांडी मारल्याचे पहायला मिळाले.
आधीच लोकसभा निवडणुकीत आणि यानंतर आता राज्यसभेवरही इच्छुक असताना डावलण्यात आल्याने मंत्री छगन भुजबळ हे नाराज असून, या नाराजीतून भुजबळ काही मोठा निर्णय घेतील का..?. छगन भुजबळ पुन्हा शरद पवारांची साथ देतील का..? अशा चर्चा सध्या राज्याचा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. मात्र, काल एका मुलाखतीत त्यांनी या चर्चा फेटाळून लावत आपण अजित पवारांसोबतच राहणार असल्याचे सांगितले. पण दुसरीकडे जिल्ह्यात असतानाही छगन भुजबळ बैठकीकडे पाठ फिरवल्याने पुन्हा एकदा घरवापसी आणि नाराजीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. (Nashik Teachers Constituency)
नाशिक शिक्षक मतदारसंघातील महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विद्यमान आमदार किशोर दराडे (Kishor Darade) यांच्या प्रचारार्थ आज नाशिक येथे महायुतीची नियोजन बैठक पार पडली. किशोर दराडे हे महायुतीचे उमेदवार असतानाही अजित पवार गटाने महेंद्र भावसार यांना उमेदवारी दिली असून, यासंदर्भात बैठकीत निर्णय होण्याची शक्यता असतानाही भुजबळ या बैठकीस अनुपस्थित राहिले.
Nashik Teachers Constituency | नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या लढतीत दिंडोरी लोकसभेचा ‘तो’ फॉर्म्युला..?
Nashik Teachers Constituency | अजित पवार गटाकडूनही उमेदवार
आज सकाळी १० वाजता मंत्री छगन भुजबळ हे नाशिककडून आपल्या येवला मतदारसंघाकडे रवाना झाले. दरम्यान, नाशिकमध्ये असूनही छगन भुजबळ यांनी बैठकीकडे पाठ फिरवल्याने हा जिल्हाभरात चर्चेचा विषय ठरला. तर दुसरीकडे अजित पवार गटाचे इतर आमदार माणिकराव कोकाटे, सरोज अहिरे हे या बैठकीला उपस्थित होते.(Nashik Teachers Constituency)
नाशिक शिक्षक मतदार संघाची जागा ही शिंदे गटाच्या वाट्याला आली असून, येथून किशोर दराडे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. मात्र, असे असतानाही अजित पवार गटाकडून महेंद्र भावसार यांना नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एबी फॉर्म देण्यात आला होता. महायुतीने अधिकृत उमेदवार दिलेला असतानाही अजित पवार गटाने आपला स्वतंत्र उमेदवार दिल्याने अजित पवार गटाच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. (Nashik Teachers Constituency)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम