नाशिक : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीनंतर विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. कोकण, मुंबई पदवीधर आणि मुंबई, नाशिक शिक्षक या चार मतदार संघांसाठी ही निवडणूक घेण्यात येत आहे. दरम्यान, या निवडणुकीतही चर्चेत असलेल्या नाशिक शिक्षक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्या प्रचार नियोजनाची बैठक एस.एस.के हॉटेल नाशिक येथे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडली. यावेळी महायुतीचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Nashik | विरोधकांचा केविलवाणा प्रयत्न
दरम्यान, या बैठकीला संबोधित करताना आपला विजय निश्चित आहे, असे म्हणत मंत्री भुसे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. मात्र, गाफील न राहता प्रत्येक मतदार शिक्षकांपर्यंत पोहचून मतदानाचा टक्का कसा वाढेल याकडे लक्ष द्यावे. माघार घेतलेल्या अनेक इच्छुकांनी दराडे यांच्यासाठी माघार घेतली आहे. विरोधकांनी नाम साधर्म्य असलेले उमेदवार उभे करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. याचा अर्थ आपल्या उमेदवाराची भीती विरोधकांना आहे. शिक्षकांसाठी सर्वाधिक काम करणारा आमदार म्हणून दराडे यांची ओळख आहे. शिक्षकांच्या प्रत्येक प्रश्नात गांभीर्याने लक्ष दिले असून, प्रत्येकाच्या कामात लक्ष घातल्याने विजय सोपा असल्याचे मंत्री भुसे म्हटले.
Dadaji Bhuse | शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा; मंत्री भूसेंचे कृषी विभागाला निर्देश
कामाला लागण्याच्या सूचना
प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपल्या विभागातील मतदार नातेवाईक, मित्र यांच्यासमवेत चर्चा करून मतदान करून घ्यावे. आ. दराडे यांनी केलेलं काम मतदारांपर्यंत पोहचविले. तर मतदार नक्कीच आपलं पवित्र दान आपल्याला देतील असा विश्वास देखील मंत्री भुसे यांनी व्यक्त केला. प्रत्येकाने आपले हेवेदावे बाजूला ठेवावेत. महायुतीचे अधिकृत उमेदवार हे आ. दराडे आहेत. त्यांचे नियोजन अतिशय चांगले आहे. आपण स्वतः उमेदवार आहोत. हे समजून कामाला लागण्याच्या सूचना यावेळी त्यांनी उपस्थितांना केल्या.
नाशिक शिक्षक मतदार संघ निवडणुकीत महायुतीतर्फे आ. किशोर दराडे हे उमेदवारी करत असून त्यांच्या प्रचारार्थ आज महायुतीच्या घटक पक्षांची बैठक घेत नियोजन करण्यात आले. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त करत उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार केला. यावेळी आ. देवयानी फरांदे, आ. सरोज अहिरे, आ. माणिकराव कोकाटे, आ. सीमा हिरे, आ. राहुल ढिकले, मा. खा. हेमंत गोडसे, आदी मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Dada Bhuse | खचून जाऊ नका सरकार तुमच्यासोबत; तातडीने पंचनामा करण्याचे मंत्री भुसेंचे निर्देश
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम