नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची बदली; औंगाबाद गुन्हे अन्वेषण विभाग अधीक्षक पदी नियुक्ती

0
3

नाशिक : नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची बदली झाली असून त्यांना औंगाबाद येथे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधीक्षक पदाची जबाबदारी मिळाली आहे. नाशिक जिल्ह्याचा आता नवीन अधीक्षक कोण येणार याची उत्सुकता लागली आहे. आज राज्यातील काही जिल्हयातील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून त्यात नाशिकचे कर्तव्यदक्ष अधिकारी सचिन पाटील यांचा देखील सहभाग आहे.

नाशिक जिल्ह्यात अनेक दिवसापासून चर्चेत असलेले डॅशिंग दबंग पोलीस अधिकारी म्हणून जिल्ह्यात ओळख निर्माण करणारे नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची अखेर राज्य सरकारने बदलीचे आदेश काढले. सचिन पाटील यांची औरंगाबाद येथे गुन्हे अन्वेषण विभाग येथे बदली करण्यात आली असून त्यांना नवीन जबाबदारी देण्यात आली आहे.

मागील वर्षी राज्य सरकारने त्यांचे बदलीचे आदेश काढले होते व सचिन पाटील यांनी कॅटमध्ये धाव घेत याचिका दाखल केली होती सदर राज्य सरकारने काढलेले बदलीचे आदेश हे चुकीचे असून असे त्यांनी कॅटमध्ये म्हटले होते परंतु काही दिवसांनी कॅटने सचिन पाटील यांची याचिका फेटाळत सदर राज्य सरकारचे बदलीचे आदेश योग्य असून राज्य सरकारचा निर्णय कायम करण्यात यावा यामुळे अनेक दिवसांपासून जिल्ह्यात चर्चेला उधाण आले होते.

राज्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने कॅबिनेटची बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीमध्ये अनेक निर्णय घेण्यात आले यामध्ये जिल्ह्यातील वर्ग अ चे अधिकारी यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले तसेच नाशिक शहर पोलीस दलातील उपयुक्त संजय बारकुंड यांचे देखील बदली करण्यात आली असून ते आता त्यांच्यावर धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांची देखील बदली झाली असून त्यांच्या जागेवर जळगाव अधिक्षकपदी एम. राजकुमार यांची नियुक्ती करण्यात आली. जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या बदलीची चर्चा सुरू होती. नुकत्याच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यात जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची देखील बदली झाली होती. जळगावचे पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी आता नागपूर लोहमार्ग पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांची वर्णी लागली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here