Nashik Shivsena | नाशिकमध्ये ठाकरे गटाचे दोन उमेदवार जाहीर; मविआत वादाची ठिणगी..?

0
98
Nashik Shivsena
Nashik Shivsena

नाशिक :  राष्ट्रवादी शरद पवार गटानंतर आता अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटानेही नाशिककडे मोर्चा वळवला असून, नाशिक जिल्ह्यातील मतदार संघांचा आढावा घेत उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. दरम्यान, अजित पवार गटाकडून एक, तर आता ठाकरे गटाने थेट दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. दरम्यान, अद्याप महायुती किंवा महाविकास आघाडीत जागावाटपाबाबत कुठलीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे नाशिकच्या या उमेदवारांमुळे महाविकास आघाडी आणि महायुतीतही मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघांची चाचपणी केली जात होती. यानंतर आज विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024)  पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची (Shiv Sena UBT) नाशिकमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत ठाकरे गटाने थेट उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, अद्याप महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा बाकी आहे.(Shivsena)

Nashik Lok Sabha Election | नाशकात आजी-माजी आमदारांमध्ये बाचाबाची; घाबरून मतदारांची पळापळ

झिरवाळ यांच्या उमेदवारीवरुन युतीत वाद 

नुकतेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) हे नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी दिंडोरी (Dindori) मतदार संघातून नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांची उमेदवारी जाहीर केली. महायुतीत जगावाटपाची चर्चा झालेली नसताना उमेदवारी जाहीर केल्यामुळे महायुतीत तणावाची परीस्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे. यापाठोपाठ आता महाविकास आघाडीत ठाकरे गटानेही उमेदवारी जाहीर केल्याने महाविकास आघाडीतही वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. (Nashik Shivsena)

NCP Ajit Pawar | नाशिकमधील अजित पवार गटाचा पहिला उमेदवार जाहीर

Nashik Shivsena |  बडगुजर आणि गिते यांना उमेदवारी  

शिवसेना ठाकरे गटाच्या आजच्या बैठकीत नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी तर, नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार वसंत गिते (Vasant Gite) यांनी निवडणूक लढवावी, असं निर्णय आजच्या या बैठकीत एकमुखाने घेण्यात आला आहे. नाशिक पश्चिम विधानसभेत सध्या भाजपच्या सीमा हिरे तर, नाशिक मध्य विधानसभेतून भाजपच्या देवयाणी फरांदे या गेल्या दोन टर्मपासून आमदार आहेत.

गिते आणि फरांदे यांच्यातील वाद सर्वश्रुत 

नाशिक मध्य विधानसभा मतदार संघातून 2009 च्या निवडणुकीत वसंत गिते यांनी मनसेकडून निवडणूक लढवली होती आणि ते विजयी झाले होते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आमदार देवयाणी फरांदे आणि वसंत गिते यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. त्यामुळे या वादाच्या पार्श्वभूमीवर गिते यांच्या उमेदवारीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

Sudhakar Badgujar | डॉनसोबतचा धरलेला ठेका भोवला; अखेर बडगुजरांवर गुन्हा दाखल..?

बडगुजर यांच्यावर आतंकवादी कुत्ता सोबत पार्टीचे आरोप 

तर, दुसरीकडे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर हे हिवाळी अधिवेशनापासून चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांच्यावर आतंकवादी सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी केल्याचे आणि नाशिक महानगर पालिकेत कथित गैरव्यवहार केल्याचे आरोप आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळातही त्यांना तडीपारची नोटिस बजावण्यात आली होती. बडगुजर खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय आहेत.

नाशिकमधील शिवसैनिकांचा प्रस्ताव हा पक्ष श्रेष्ठींकडे पाठवला जाणार आहे. महाविकास आघाडीत जागावाटप अद्याप झालेली नसताना ठाकरे गटाकडून थेट उमेदवार जाहीर करण्यात आल्याने महाविकास आघाडीतही मिठाचा खडा पडणार का..? हे पहावे लागणार आहे.  कारण नाशिक मध्यमधून अपूर्व हिरे हेदेखील इच्छुक असल्याची चर्चा आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here