Jitendra Avhad | जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला; संभाजीराजेंवरची ‘ती’ टिका भोवली

0
73
Jitendra Avhad
Jitendra Avhad

Jitendra Avhad |  शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याची मोठी बातमी समोर येत आहे. नुकतंच दोन दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच आता जितेंद्र आव्हाड यांच्या चालत्या गाडीवर तीन अज्ञात इसमांनी हल्ला केला आहे. माजी खासदार तथा स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांच्यावर जितेंद्र आव्हाड यांनी टिका केली होती.

विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी त्यांच्या संघटनेसह व शिवभक्तांसह विशाळगाडवर आंदोलन केलं होतं. या दरम्यान तेथील एका गावात दगडफेक झाल्याचा प्रकार समोर आला होता. सांभाजीराजे यांच्या या आंदोलनानंतर जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजेंवर टीका केली होती. या टीकेनंतर संभाजीराजे छत्रपती आणि त्यांच्या स्वराज्य पक्षाकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला होता.

दरम्यान, आज जितेंद्र आव्हाड छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना ते संभाजीनगर येथून ठाण्याच्या दिशेला निघाले असता तीन अज्ञात इसमांनी त्यांच्या गाडीवर हा हल्ला केला असून, या हल्ल्याची जबाबदारी स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून स्वीकारण्यात आली आहे.स्वराज्य संघटनेतर्फे एक व्हिडीओ जारी करण्यात आला असून, या व्हिडीओत स्वराज्य संघटनेचा कार्यकर्ता हा या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत आहे.

Jitendra Awhad | भुजबळांचे वारे शरद पवार गटाच्या दिशेने..?; जितेंद्र आव्हाडांची पाठराखण

Jitendra Avhad | नेमका कसा केला हल्ला ?

जितेंद्र आव्हाड हे ठाण्याच्या दिशेने जात असताना त्यांची गाडी एका सिग्नलवर थांबलेली होती. याचवेळी स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केला. यावेळी आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर लाकडी दांडूकांने जोरदार हल्ला केला व आव्हाड यांच्या कारच्या काचा फोडण्याचा प्रयत्न केला.

संभाजीराजेंचं रक्त तपासण्याची गरज; आव्हाडांची टिका 

“संभाजीराजे यांना छत्रपती म्हणणं सोडून द्यावं. त्यांची जी वंशपरंपरा होती, त्यांना जो अधिकार मिळाला होता, ते ज्या वंशाचं रक्त पुढे घेऊन जात होते. त्या रक्तामध्ये काय होतं आणि यांच्याकडे काय आहे? हे तपासण्याची गरज असून, छत्रपती शाहू महाराजांच्या घराण्यातील माणूस हा दंगल होऊ शकते अशा प्रकारची वक्तव्य करतो. तो शाहू महाराजांचा वारसदार असूच शकत नाही”, असं वादग्रस्त वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं.

Jitendra Awhad | अजितदादांविषयी बोलायची आव्हाडांची लायकी नाही; उदयकुमार आहेरांचे आव्हाडांना ओपन चॅलेंज


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here