Nashik Politics | अखेर 15 मतदार संघाचे चित्र स्पष्ट; 137 उमेदवारांची माघार, 200 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

0
32
#image_title

Nashik Politics | विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आता आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. माघारीनंतर नाशिक जिल्ह्यातील 15 मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झाले असून जिल्ह्यातील 15 मतदार संघात एकूण 337 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. आज माघारीच्या दिवशी 137 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आणि 200 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.

Nashik Political | नाशिक पश्चिमसह ‘या’ मतदारसंघातील उमेदवारांनी घेतली माघार

मालेगाव बाह्य मधून सर्वाधिक उमेदवार निवडणूक लढवणार

तर मालेगाव बाह्य मतदार संघात सर्वाधिक 21 उमेदवार लढणार असून कळवणला अवघे 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर नांदगाव मतदारसंघात सर्वात जास्त 18 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतली आहेत.

Nashik Politics | अखेर बंडोबांना मनवण्यात महायुतीला यश; नाशिक मध्य मधून दोन नेत्यांची माघार

15 मतदारसंघांपैकी 137 उमेदवारांनी घेतली माघार

नांदगावातून 18, मालेगाव मध्यतून 3, मालेगाव बाह्य 11, बागलाण 9, कळवण (अज) 8, चांदवड 8, येवला 17, सिन्नर 10, निफाड 8, दिंडोरी (अज) 8, नाशिक पूर्व 2, नाशिक मध्य 11, नाशिक पश्चिम 7, देवळाली (अज) 6, इगतपुरीतून (अज) 11 उमेदवारांनी माघार घेतली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here