Nashik Politics | नाशिक मध्य मतदारसंघाचा तिढा सुटेना; देवयानी फरांदेंच्या अडचणींत वाढ!

0
8
#image_title

Nashik Politics | भारतीय जनता पक्षासाठी नाशिक मध्य मतदार संघाचा प्रतिष्ठेचा विषय होत चालला असून महाविकास आघाडीने त्यावर तोडगा काढला आहे. मात्र भारतीय जनता पक्षाला अद्यापही याबाबत निर्णय घेता आला नसल्यामुळे आता यामध्ये मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. नाशिक मध्य मतदारसंघात सध्या भाजपाच्या देवयानी फरांदे आमदार आहेत. पक्षाने अन्य विद्यमान आमदारांना उमेदवारी जाहीर केली असून आमदार फरांदे यांना अद्याप उमेदवारी देण्यात आलेली नाही.

Nashik Political | नाशिक पश्चिममध्ये भाजपला फटका; बंडखोरी अटळ?

वरीष्ठ नेत्यांना उमेदवारी बदलण्याचा इशारा

तर पक्षाने केलेल्या तीन अंतर्गत सर्वेक्षणाचा आधार त्याकरिता घेण्यात आल्याचे बोलले जाते. तसेच भाजपच्या या निर्णयावर आमदार फरांदे चांगल्याच संतापल्या असून गेले 2 दिवस त्या मुंबईत तळ ठोकून आहेत. आमदार फरांदे कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी मिळावी यासाठी नेत्यांचा पिच्छा पुरवत असून त्यांनी सोबत शहरातील काही माजी नगरसेवक देखील नेले असल्याची माहिती आहे. मात्र भाजपाचे अन्य इच्छुक देखील इरेला पेटले असून या इच्छुकांनी विद्यमान आमदार फरांदे यांना तीव्र विरोध दर्शविला आहे. महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती सुरेश पाटील यांनी यासंदर्भात जोरदार प्रयत्न केले असून पक्षाचे प्रदेश सचिव लक्ष्मण सावजी यांनीही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना उमेदवारी बदलण्यासाठी इशारा दिला आहे.

उमेदवारीचा निर्णय दोन दिवस पुढे जाणार

परीणामी नाशिक मध्य मतदारसंघ जागा वाटप आणि उमेदवारी याचा निर्णय आणखी दोन दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता असून तशी मानसिक तयारी इच्छुकांनी देखील ठेवली आहे. यामुळे आमदार फरांदेंसाठी पुढील दोन दिवस फार महत्त्वाचे ठरणार आहेत. दरम्यान, आमदार फरांदे यांना पर्याय म्हणून भाजपचे संकट मोचक नेते गिरीश महाजन यांनी पुढाकार घेत काँग्रेसच्या इच्छुक असलेल्या एका महिला उमेदवाराशी महाजन यांच्या वतीने काही नेते संपर्कात असल्याचे बोलले जाते. त्यामुळे नाशिक मध्य मतदारसंघाचा तिढा दिवसेंदिवस वाढत चालल्याचे चित्र आहे.

NCP Ajit Pawar | शिंदेसेने पाठोपाठ अजित पवार गटाची उमेदवार यादी जाहीर

नाशिक मध्यचा तिढा सुटेना

महाविकास आघाडी मात्र या जागेसाठी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटात चुरस होती. मात्र काँग्रेसकडे प्रभावी उमेदवार नसल्यामुळे मंगळवारी रात्री झालेल्या चर्चेत नाशिक मध्य मतदारसंघ व उमेदवार याबाबत महाविकास आघाडीने तोगडा काढला असून भाजप मात्र अद्यापही उमेदवारीचा निर्णय घेण्यासाठी चाचपडताना दिसून येतेय.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here