Chagan Bhujabal | कांदे-भुजबळ वाद पुन्हा पेटणार….?; भुजबळांच्या पोस्टने भुवया उंचावल्या

0
48
#image_title

Chagan Bhujabal | राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोमाने तयारीला लागले असून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपासह उमेदवारी बाबत चर्चा सुरू आहेत. अशातच दोन्ही आघाड्यांमध्ये उमेदवारीसाठी जागा वाटपावरून वाद सुरू असल्याचे पाहायला मिळते आहे. त्याचचं एक उदाहरण आता नाशिक जिल्ह्यातील नांदगाव विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळालं आहे.

Chagan Bhujabal | मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याला यश; किकवी पेयजल प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

महायुतीत वादाची ठिणगी? 

नांदगाव मतदार संघामध्ये सध्या महायुतीतील शिंदेंच्या शिवसेनेचे सुहास कांदे आमदार आहेत. परंतु याच मतदारसंघात आता महायुतीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी पुतणे समीर भुजबळ यांच्यासाठी दावा केला आहे. पुतणे समीर भुजबळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना केलेल्या पोस्टमध्ये “नाशिक जिल्ह्यासह नांदगाव-मनमाड मतदार संघाला आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी उदंड आयुष्य लाभो.” असे म्हटले. तर दुसरीकडे समीर भुजबळ अनेक दिवसांपासून मतदार संघात तळ ठोकून असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे भुजबळांच्या या शुभेच्छांवरून महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडणार असल्याची शक्यता आहे.

मंत्री भूसेंचे भुजबळांना सणसणीत उत्तर

पुतणे समीर भुजबळ यांना छगन भुजबळांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी पोस्ट केल्यानंतर शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांनी यावर भाष्य करत “नांदगाव विधानसभेत शिवसेनेचे सुहास कांदे आमदार आहेत. दाबा करणे ठीक आहे लोकशाहीत सर्वांना तसा अधिकार आहे. मात्र नांदगावमध्ये शिवसेनेचा आमदार असल्यामुळे ती जागा आमचीच आहे. आम्ही येवला मतदारसंघ दावा केला तर ते उचित ठरेल का?” असे म्हणत भुजबळांना उत्तर दिले असून यामुळे नांदगावच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच होणार पहायला मिळणार आहे.

Chagan Bhujabal | भुजबळांच्या सभेत हनुमान चालीसेमुळे व्यत्यय; तातडीने आवाज कमी करण्याचे दिले आदेश

पोस्टमध्ये भुजबळांनी नेमकं काय म्हटलं? 

“नाशिक जिल्ह्यातील विकास कार्यात मला खंबीरपणे साथ देणारे माझे खासदार व मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष समीर भुजबळ यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!! राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेपासूनच पक्षात आणि नाशिकच्या राजकारणात माझ्या बरोबरीने काम करताना, ते कुटुंबातील जबाबदाऱ्या सक्षमपणे सांभाळत आले आहेत. त्यांची मेहनती व अभ्यासू वृत्ती, नाविन्याचा ध्यास आणि दूरदृष्टी या गुणांमुळे एक उत्तम लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आजवर आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. तर आगामी काळामध्ये ते अशाच पद्धतीने काम करत राहतील, जनतेने दिलेल्या जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पाडतील असा विश्वास आहे. नाशिक जिल्ह्यासह नांदगाव-मनमाड मतदार संघाला आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी तुला उत्तम व उदंड आयुष्य लाभो मनापासून शुभेच्छा!”


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here