Nashik Politics | नाशकात शिवस्वराज्य यात्रेवरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत बिनसलं

0
68
Sharad Pawar
Sharad Pawar

Nashik Politics | राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेमुळे नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षात नाराजीचे सूर ऐकू येऊ लागले आहेत. देवळाली विधानसभा मतदारसंघ हा 90% ग्रामीण भागात मोडतो तरी टक्के शहरी भागात असलेल्या विहितगाव परिसरात शिवस्वराज्य यात्रे निमित्त मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यावरून आता राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये नाराजी असून शहरी भागात सभा आयोजित करून नेमके काय साध्य करायचे आहे. असा सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.

Nashik Politics | नाशकात जागावाटपावरून महायुती पाठोपाठ मविआत देखील रस्सीखेच

या दिवशी नाशकात येणार शिवस्वराज्य यात्रा

गुरूवार दिनांक 25 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने सुरू झालेली यात्रा नाशिक व देवळाली मतदारसंघांमध्ये येणार आहे. तालुकाध्यक्ष रामकृष्ण झाडे यांच्या अध्यक्षतेखाली यात्रेच्या स्वागतासाठी बैठक पार पडली. शिवस्वराज्य यात्रा दिनांक 25 रोजी विहितगाव येथील साईग्रॅंड लॉन्स येथे पोचणार आहे.

सकाळी 11 वाजता प्रदेश अध्यक्ष आमदार खासदार डॉ. अमोल कोल्हे व युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांची जाहीर सभा होणार असून मेळावा व सभा विहितगावातील लॉन्स या परिसरात पार पडणार आहे. हा परिसर नाशिक शहरात मोडत असून यामध्ये देवळाली मतदारसंघातील एका प्रभागाचा समावेश आहे. तर भगूर देवळाली या शहरासह 64 खेडी ग्रामीण भागात मोडतात. सिन्नर इगतपुरी व नाशिकच्या सीमेवर असलेल्या भगूर, देवळाली परिसरात हा मेळावा व सभा घेतली गेल्यास तीनही तालुक्यातील कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक ठरू शकते. देवळाली कॅम्प, भगूरसह दारणा काठच्या पट्ट्यामध्ये एक लाख मतदान असताना या भागात मेळावा होणे अपेक्षित होते. परंतु पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागाचा विचार न करता आपल्या सोयीनुसार विहितगाव येथे मेळावा व मेळावा व सभेचे आयोजन केल्यामुळे ग्रामीण भागातील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Nashik Politics | नाशकात जागांसाठी मविआत महासंग्राम?; जास्त जागा कोणाला मिळणार?

मागील निवडणुकीत सर्वाधिक मतदान

देवळाली कॅम्प हे शहर मतदार संघातील सर्वात मोठे मतदार असलेले शहर आहे. लगत भगूर शहर व दारणा पट्ट्यातील बेतलगव्हाण, शेवगेदारणा, संसरी, राहुरी, दोनवाडे, लहवित, वंजारवाडी, लोहशिंगवे, शिंगवेबहुला या पट्ट्यामध्ये सुमारे 90 हजार ते एक लाखांपर्यंत मतदान आहे. 2019 च्या पंचवार्षिकमध्ये या भागातून राष्ट्रवादीचे आमदार सरोज अहिरे यांना मोठे मताधिक्य दिले गेले होते. राष्ट्रवादी पक्षाचा मतदार हा शरद पवारांच्या विचारांचा अनुयायी व पक्षाला मानणारा आहे. पण पक्षाकडून केल्या गेलेल्या सभेच्या नियोजनामुळे आता कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here