Nashik Political | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून उमेदवार यादी जाहीर होत असताना नाशिक शहरातील चार मतदारसंघांपैकी तसेच नाशिक जिल्ह्यातील मतदारसंघातील एकही जागा अद्याप काँग्रेसला सोडण्यात आली नसल्यामुळे काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून याचा निर्देश म्हणून गुरुवार दि. 24 ऑक्टोबर रोजी काही नाराजांनी नाशिक शहर काँग्रेस कमिटीला टाळे ठोकून आंदोलन केले आहे.
Nashik Politics | नांदगावात महायुतीला फटका; समीर भुजबळ अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार
शहरात काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात?
काँग्रेसचे नेते, प्रदेश पदाधिकारी व शहराध्यक्षांनी काँग्रेसला जागा मिळाव्यात याकरिता प्रयत्न केले नाहीत. यामुळे काँग्रेसला नाशिकमध्ये एकही जागा मिळाली नसल्यामुळे शहरात काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे कट्टर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्यातील खदखद बाहेर काढत आपल्याच पक्षाच्या कार्यालयाला टाळे ठोकत, काँग्रेसच्या नेत्यांचा व प्रदेश पदाधिकाऱ्यांचा निषेध नोंदविला आहे.
Nashik Political | निफाडचा सस्पेन्स कायम; भाजप नेत्यामुळे बनकरांचा एबी फॉर्म वेटिंगवर..?
याप्रसंगी आदी पदाधिकारी उपस्थित होते
दरम्यान, यावेळी काँग्रेसचे नेते सुरेश मारु, पंचवटी ब्लॉकचे अध्यक्ष उद्धव पवार, सेवा दलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर, सातपूर ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष कैलास कडलक, सिडको ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष विजू पाटील, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा वंदना पाटील, देवाभाऊ देशपांडे, युवक काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष जयेश पोकळे, जावेद पठाण, ज्युली डिसूजा, महेश देवरे, देवेन मारू, राजकुमार जेफ, कैलास महाले, अशोक लहामगे, फारुख मन्सुरी, जयदीप चौधरी आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम