Nashik News | विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर, रविवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी भाजपने आपल्या पहिल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केली. यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून देखील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. दरम्यान, महाविकास आघाडीकडून मात्र अद्यापही कोणत्याही घटक पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर न केल्याने उत्सुकता शिगेला लागली होती. त्यात जागांवरून तिढा सुटत नसल्याच्या चर्चा नाही उधाण आले होते.
Nashik News | मालेगावात रस्त्यांची चाळण; पावसामुळे प्रशासनाचा ढिसाळ कारभार उघडकीस
नाशिकच्या दोन जागा ठाकरे गटाला?
अशातच आता याच संदर्भात मोठी माहिती समोर आली असून नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिम या दोन्ही जागा महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे गेल्या असल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक पश्चिम मधून सुधाकर बडगुजर तर नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार वसंत गीते यांना संधी देण्यात आली आहे. तर थोड्याच वेळात उमेदवारीची जाहीर घोषणा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Nashik News | “उमेदवारांनी अर्ज दाखल करताना सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे”-जिल्हाधिकारी जलज शर्मा
हिरे विरुद्ध बडगुजर लढत पहायला मिळणार?
दरम्यान, रविवारी भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये नाशिक पश्चिम मधून विद्यमान आमदार सीमा हिरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत सीमा हिरे विरुद्ध सुधाकर बडगुजर अशी लढत पाहायला मिळणार आहे. तर सीमा हिरे यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपतील इतर इच्छुक नाराज असल्याची चर्चाही होत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत जनता कुणाच्या पाठीशी उभी राहणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम