Nashik News | राज्यामध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून 22 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर 2024 या कालावधीत भारतीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सकाळी 11 ते 3 ही वेळ देण्यात आली आहे. या निर्धारित वेळेत उमेदवारांनी आपले अर्ज दाखल करताना सूचनांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.
उमेदवारी अर्ज करताना लक्षात ठेवायचे मुद्दे
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना जिल्ह्यातील एकूण 15 विधानसभा मतदारसंघांसाठी 22 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर 2024 कालावधीत नामनिर्देश पत्र दाखल करता येणार असून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवाराची पात्रतेत प्रामुख्याने उमेदवार भारतीय नागरिक असावा, उमेदवाराचे नाव महाराष्ट्र विधानसभेच्या मतदार यादीत असणे बंधनकारक, उमेदवाराचे वय 25 वर्ष पेक्षा जास्त असावे, नामनिर्देशन पत्र दाखल करताना उमेदवारांनी नामनिर्देशन पत्राचा ‘2 इ’ नमुना अर्ज भरवायचा आहे. तसेच उमेदवाराला निवडणूक निर्णय महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची घोषणा अधिकारी यांच्याकडे शपथ दृढ कथन करावे लागेल. उमेदवाराने मतपत्रिकेवरील फोटो बाबतचे घोषणापत्र सादर करावे, शपथपत्र नमुना 26 प्रथम वर्ग दंडाधिकारी नोटरी यांच्या सक्षम स्वाक्षरी करून सादर करावा तसेच राजकीय उमेदवारांनी पक्षाने प्राधिकृत केल्याबाबत विहित सूचनापत्र, नामनिर्देशन पत्र अर्जाच्या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे.
त्याचबरोबर, मतपत्रिकेवर नाव कसे असावे याबाबत उमेदवारांनी लेखी पत्र द्यावे, नामनिर्देशन पत्रासोबत जमा करायची अनामत रक्कम रुपये 10 हजार रुपये, अनुसूचित जाती अथवा अनुसूचित जमाती वर्गातील उमेदवारांसाठी 5 हजार रुपये रोख स्वरूपात जमा करण्यात यावी. एक उमेदवार जास्तीत जास्त चार नामनिर्देशन पत्रे सादर करू शकेल तसेच एक उमेदवार दोन पेक्षा जास्त मतदार संघात अर्ज करू शकणार नाही. त्याचबरोबर उमेदवारास मान्यता प्राप्त राजकीय पक्षाचा असल्यास एक सूचक तर अमान्य प्राप्त पक्षाचा किंवा अपक्ष असल्यास एकूण दहा सुचक आवश्यक असल्याच्या विधानसभा निवडणुकीत खर्चाची मर्यादा निवडणूक आयोगाने निश्चित करून दिली आहे. त्याच्यानुसार उमेदवारास 40 लाख रुपये इतकी खर्च मर्यादा निश्चित करून देण्यात आली आहे.
उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या निर्देशांचे पालन करावे
तसेच, उमेदवारांनी निवडणुकीसाठी केलेल्या खर्चाचा हिशोब ठेवायचा असून उमेदवारांचा खर्चाचा तपशील तपासण्यासाठी लोकसभा मतदारसंघनिहाय खर्च निरीक्षक यांची नियुक्ती निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. त्यांच्याकडे या खर्चाचा अहवाल सादर करायचा असून नामनिर्देशन पत्र दाखल करणाऱ्या उमेदवारांनी या सर्व बाबींची नोंद घेऊन नामनिर्देशन पत्र निर्धारित वेळेत दाखल करायचे असून नामनिर्देशनपत्र दाखल करताना भारत निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या निर्देशनाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा अधिकारी शर्मा यांनी सांगितले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम