Chagan Bhujabal | निवडणुकीची रणधुमाळी सुरू; 24 तारखेला शक्तीप्रदर्शन करत छगन भुजबळ येवल्यात उमेदवारीचा अर्ज भरणार!

0
42
#image_title

Chagan Bhujabal | राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर आता सत्ताधारी आणि विरोधी पक्ष उमेदवारांची यादीच्या लगबगीत असून महायुतीतील 2 घटक पक्षांकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यानंतर आता या नेत्यांकडून शक्तिप्रदर्शन तसेच प्रचारास सुरुवात झाली आहे.

Chagan Bhujabal | युवक राष्ट्रवादीकडून मंत्री छगन भुजबळांचा वाढदिवस उत्साहात साजरा

24 तारखेला छगन भुजबळ उमेदवारी अर्ज भरणार

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे गुरुवार दिनांक 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता येवला येथे जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारीचा अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी 10 वाजता संपर्क कार्यालय येथून भव्य रॅली काढण्यात येणार असून सकाळी दहा वाजता रॅलीला संपर्क कार्यालयातून सुरुवात करत विंचूर, चौफुली, फत्तेपूर नाका मार्गे येवला तहसीलदार कार्यालयाच्या दिशेने वळवण्यात येणार आहे.

Chagan Bhujabal | छगन भुजबळांचे भावनिक आवाहन; ही निवृत्तीची घोषणा की विधानसभेसाठी नवा डाव…?

एन्झोकेम हायस्कूल मैदानात भव्य सभेचे आयोजन

त्यानंतर महायुती घटक पक्षातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत छगन भुजबळ आपल्या उमेदवारीचा अर्ज दाखल करणार आहेत. या रॅलीत 20 हजारांहून जास्त नागरिक सहभागी होतील असा अंदाज आहे. रॅलीनंतर भुजबळांची एन्झोकेम हायस्कूल मैदान येथे भव्यसभा पार पडणार असून यावेळी ते सर्वांना संबोधित करणार असल्याची माहिती आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here