Keda Aaher | राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष जागा वाटपाच्या कामात व्यस्त असून काल भाजपने आपल्या पहिल्या यादीत 99 उमेदवारांची नावे जाहीर केली. या यादीमध्ये नाशिकच्या देवळा-चांदवड मतदारसंघातून डॉ. राहुल आहेर यांना संधी देण्यात आली असून यामुळे आता नाशकात राजकीय समीकरणात बदल होण्याची शक्यता आहे.
Deola | चांदवड-देवळा मतदारसंघात ‘नाना की दादा ‘ आज मुंबईत फैसला
निवडणुकीत “नाना विरुध्द दादा” पाहायला मिळणार?
देवळा-चांदवड मतदारसंघातून डॉ. राहुल आहेर यांचे बंधू केदा आहेर हे या विधानसभा निवडणुकीसाठी याच मतदारसंघातून इच्छुक होते. त्याकरिता त्यांनी फार पूर्वीपासूनच तयारी सुरू केली होती. अशातच डॉ. राहुल आहेर यांनी आपण देवळा-चांदवड मतदार संघातून माघार घेत असून बंधू केदा आहेर यांचा पक्षाने उमेदवारीकरिता विचार करावा. असे अशी मागणी केली होती. त्यानंतर काल भाजपने जाहीर केलेल्या यादीत नाशिकच्या चांदवड-देवळा मतदारसंघातून डॉ. राहुल आहेर यांचे नाव जाहीर करण्यात आले. यामुळे आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर दोन भावांमध्ये वादाची ठिणगी पडली असून निवडणुकीच्या रिंगणात मोठी खडाजंगी पहायला मिळणार चित्र आहे.
Deola | चांदवड-देवळ्याच्या राजकारणाला रंजक वळण; राहुल आहेर उमेदवारी मागे घेण्यावर ठाम
एल्गार मेळाव्यातून निवडणुकीचा रणशिंग फुंकणार
तसेच केदा आहेर बंडखोरी करण्याच्या तयारीत असून अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याची चर्चा होत आहे. तर उद्या संध्याकाळी 6 वाजता केदा आहेर एल्गार मेळावा घेणार असून या एल्गार मेळाव्यातून निवडणुकीच रणशिंग फुंकणार असल्याची माहिती समोर आली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम