Nashik political : ५० दिवसांचा तुरंगवास, राज्यभरात ७ गुन्हे आणि आज तोच निखिल भामरे झाला भाजपचा मीडिया सहसंयोजक

0
50

Nashik political :  राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार व राज्यासह देशातील भाजप नेत्यांमध्ये कितीही गोड आणि जवळचे संबंध असले तरी मात्र हे दोन्ही पक्ष नेहमीच एकमेकांच्या विरोधात टीका करायला मागेपुढे बघत नसल्याच नेहमीच अधोरेखित झालं आहे. परंतु, बरेचदा प्रत्यक्ष भेटीत त्या आरोप-प्रत्यारोपांचा उल्लेख संबंधितांकडून केला जात नाही. मात्र मागील वर्षी एका तरुणाने राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर त्या तरुणाला भाजपने चांगल्या पगाराची नोकरी दिली असल्याच समोर आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल नाशिकमधील तरुण निखिल भामरे या तरुणाने सोशल मिडियावर आक्षेपार्ह विधान केल होत. मागील वर्षाची ही घटना आहे. या घटनेचे पडसाद त्यावेळी राज्यभरात उमटले होते.तर महाराष्ट्रातील जवळपास सात शहरांमध्ये निखील भामरे याच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते.(nashik)

https://thepointnow.in/fda-raid-2/

त्यानंतर निखिल भामरे याला अटकही झाली होती. आणि जवळपास एक महिना तो तुरुंगात होता. मात्र, आता त्याच निखिल भामरेला भाजपने सोशल मिडिया सेलचा सहसंयोजक म्हणून नियुक्त केले आहे.(nashik) राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अत्यंत खालच्या भाषेत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला भाजप पक्षाने सोशल मिडिया सहसंयोजक केल्यामुळे राष्ट्रवादीतून मोठ्या प्रमाणावर या प्रकारचा विरोध केला आहे.(nashik)

राष्ट्रवादीचे आमदार आणि युवा नेते रोहित पवार यांनी तीव्र शब्दात निखिल भामरेला मीडिया सहसंयोजक केल्याने संताप व्यक्त केला आहे.(nashik) समाजात विकृतीला खतपाणी घालण्याचे काम भाजप करत असल्याचे या प्रकारामुळे सिद्ध झाल असल्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे.(nashik)

काय होती पोस्ट

भाजपचा आत्ताचा सोशल मिडिया सहसंयोजक निखिल भामरे याने एक वर्षापूर्वी सोशल मिडियावर शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केली होती. ‘वेळ आली आहे. बारामतीच्या गांधीसाठी, बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची. #बाराचाकाकामाफी माग..’ असे ट्वीट त्याने केले होते.(nashik)

एकीकडे गुन्हेगारांना पाठीशी घातले जाणार नाही अशी वक्तव्य भाजप नेत्यांकडून सातत्याने केली जात आहेत. दुसरीकडे मात्र राज्यभरात तब्बल सात गुन्हे आणि 50 दिवसांपेक्षा जास्त तुरुंगवास भोगलेल्या निखिल भामरेला मीडिया सहसंयोजक म्हणून नियुक्त करण्यात आल्याने भाजपाच्या या निर्णयावर राज्यभरातून टीकेची झोड उठत आहे. तर अनेक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून या नियुक्तीवर आक्षेप घेत रोष देखील व्यक्त केला जात आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here