High alert : १५ ऑगस्टला देशात घातपात करण्याचा त्या दहशतवाद्यांचा होता डाव


High alert : महाराष्ट्र एटीएस आणि एनआयने अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून देशात 15 ऑगस्टला घातपात घडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती समोर येत आहे.(High alert)

दहशतवादी संघटना अल सुफा आणि आयसिस सोबत संबंध असलेल्या अनेक जणांना गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र मधून अटक करण्यात आली आहे. या दहशतवाद्यांची एक बॉम्ब बनवणारी लॅब असल्याचे देखील बोललं जात होतं. यामुळे महाराष्ट्र एटीएस कडून या दहशतवाद्यांची कसून चौकशी केली जात आहे. यामध्ये येत्या 15 ऑगस्टला देशामध्ये हातपात घडवून आणण्याचा या दहशतवाद्यांचा प्लॅन असल्याच उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.(High alert)

https://thepointnow.in/nashik-political/

फक्त भारतामध्येच नव्हे तर या दहशतवाद्यांकडून इस्त्राईलमध्ये देखील दहशतवादी कारवाया केल्या जाणार असल्याचं स्पष्ट झाला आहे. मोहम्मद युनूस साकी, मोहम्मद इमरान युनूस खान, झुल्फिकार बरोडावाला, शहानवाज आलम अशी अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत.(High alert)

यामध्ये काही दिवसांपूर्वीच अटक करण्यात आलेल्या झुल्फिकार अली बरोडावाला याने ठाण्यातील पडघा परिसरात फ्लॅट भाड्याने घेतला असल्याचा संशय असल्याने हा फ्लॅट त्याने का घेतला होता? याचा तपास महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक करत आहे. तर मुंबईतील प्रमुख ठिकाणांवर लक्ष ठेवण्यासाठी झुल्फिकार अली बरोडावाला याने हा फ्लॅट भाड्याने घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे.(High alert)

झुल्फिकार अली बडोदावाला याचे एन आय एन ने इसिस मॉडेलशी कधीच संबंध असल्याच्या कारणावरून त्याला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान ISIS आणि अल सुफ यांसारख्या दहशतवादी संघटनांसोबत संबंधित असलेल्या जवळपास पाच जणांना महाराष्ट्रातून अटक करण्यात आली आहे. रत्नागिरी, पुणे आणि कोल्हापूर या ठिकाणाहून या दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून कोल्हापूर आणि पुण्याजवळ दहशतवाद्यांनी ट्रेनिंग केलं असल्याचं तपासात समोर आल आहे.(High alert)

निपाणी, संकेश्वर मध्ये त्यांनी मुक्काम करत आंबोली मध्ये त्यांना बॉम्ब बनवण्याच प्रशिक्षण दिल जात होतं अल सुफा ही दहशतवादी संघटना मध्यप्रदेश मधील रतलाम जिल्ह्यात स्थापन करण्यात आली होती. राजस्थानच्या तरुणांना आपल्या जाळ्यात ओडून कट्टरपंथी बनवण्यासाठी इंटरनेटचा वापर केला जात असल्याच देखील आढळून आल आहे.(High alert)

दहा ते बारा वर्षांपूर्वी संघटना प्रकाशात आल्यानंतर लागलीच शासनाकडून या संघटनेवर बंदी घालण्यात आली होती.  तर या संघटनेच मुख्य टारगेट हे आरएसएसचे सदस्य आणि भाजप नेते असल्याचं तपासात समोर आलं आहे.

देशात हाय अलर्ट जारी

मध्यप्रदेश मधून पुण्यामध्ये येत या दहशतवाद्यांनी कोकणामध्ये दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेतलं आणि 15 ऑगस्टला देशात घातपात घडवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यामुळे देशातील गुप्तचर यंत्रणांनी मुंबई, दिल्ली सोबतच देशांमधील महत्त्वाच्या शहरांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.(High alert)

या संघटनांकडून देशात घातपात केला जाणार असल्याची माहिती समोर आल्यामुळे देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून 15 ऑगस्ट च्या पार्श्वभूमीवर देशभरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सतर्कता बाळगण्यात येत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Leave a Comment

Don`t copy text!