Kulgam : दहशतवाद्यांसोबत चकमकीत जखमी तिघा जवानांचा मृत्यू

0
18

Kulgam : जम्मू काश्मीर मध्ये असलेल्या कुलगाम जिल्ह्यामध्ये शुक्रवारी झालेल्या चकमकीमध्ये भारतीय लष्कराचे तीन जवान शहीद झाल्याची घटना समोर आली आहे. दहशतवादी आणि भारतीय जवानांच्या चकमकीत हे जवान शहीद झाले आहेत.J&k

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार,दक्षिण काश्मीरमधील पुलगाव या जिल्ह्यात असलेल्या हलान जंगल परिसरामध्ये काही अतिरेकी लपून बसले असल्याची माहिती भारतीय लष्कराला मिळाली.kulgam यानंतर या ठिकाणी सुरक्षा दलाच्या जवानांनी घेराबंदी करत या दहशतवाद्यांचा विरोधात शोध मोहीम सुरू केली.J&k

दरम्यान याबाबत कानोसा लागताच दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार करायला सुरुवात केली आणि या शोध मोहिमेच चकमकी मध्ये रूपांतर झालं. यावेळी जवानांकडून देखील गोळीबार करण्यात आला. मात्र, दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारामध्ये सुरक्षा दलाचे तीन जवान गंभीरित्या जखमी झाले होते. त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.J&k

https://thepointnow.in/high-alert/

जम्मू काश्मीर मधील श्रीनगर स्थित लष्कराच्या चिनार कॉपर्सने याबाबत ट्विट करून सांगितला आहे की कुलगाव मधील हलांच्या उंच जंगली भागात दहशतवादी असल्याची गुप्त माहिती समोर आली यानंतर सुरक्षा दलांनी 4 ऑगस्ट ला या ठिकाणी शोध मोहीम कारवाई सुरू केली याच दरम्यान दहशतवाद्यांसोबत झालेल्या गोळीबारात भारतीय लष्करातील तीन जवान जखमी झाले होते आणि उपचारा दरम्यान ते शहीद झाले आहेत.J&k

PAFF या दहशतवादी संघटनेने याची जबाबदारी घेतली असून कलम 370 रद्द केल्याचा बदला असल्याचे म्हटले आहे. PAFF ने एक निवेदन देखील जारी केले असून यात संघी सरकारने कलम 370 बेकायदेशीर रद्द केल्याच्या पूर्वसंध्येला आमच्याkulgam सैनिकांनी हल्ला केला असल्याच सांगण्यात आलं आहे. J&k

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवून ४ वर्षे पूर्ण

एकीकडे दहशतवाद्यांसोबत जवानांची चकमक होत आहे, तर दुसरीकडे 5 ऑगस्टला जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्याच्या निर्णयाला  4 वर्षे पूर्ण होत आहेत. यावेळी भाजपने श्रीनगरमध्ये विजयी पदयात्रा काढण्याची घोषणा केली आहे. सकाळी 9.30 वाजता नेहरू पार्क येथून निघणारी ही विजयी पदयात्रा शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटरपर्यंत जाईल.J&k त्याचवेळी खबरदारी म्हणून शनिवारी (५ ऑगस्ट) होणारी अमरनाथ यात्रा पुढे ढकलण्यात आली आहे.J&k


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here