Amdar niwas : असे असेल नवीन मनोरा आमदार निवास


Amdar niwas : मुंबई मधील नरिमन पॉइंट येथे मनोरा आमदार निवास इमारतीच्या बांधकामाच भूमिपूजन नुकतंच पार पडलं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांच्या हस्ते या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला.

या बांधकाम शुभारंभ आणि भूमिपूजनप्रसंगी विधानपरिषद उपाध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, कृषी मंत्री धनंजय मुंडे, कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची प्रमुख उपस्थिती होती. भूमिपूजन आणि शुभारंभ झाल्यानंतर कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.(amdar niwas)

मनोरा आमदार निवासाच्या १३४२९.१७ चौ.मी. भूखंड क्षेत्र असलेल्या या जागेवर ५.४ एफ.एस.आय. (FSI) च्या अनुषंगाने ७२१५६.०६ चौ.मी. प्रस्तावित प्रत्यक्ष बांधकाम आहे. आधुनिक स्थापत्यशैलीनुसार काळाच्या गरजा आणि वास्तूकलेचा वारसा यांचा संगम साधणाऱ्या मनोरा आमदार निवासाच्या ४० मजली व २८ मजली अशा दोन भव्य इमारती उभारण्यात येणार आहेत.(amdar niwas)

असा असेल नवीन आमदार निवास :
या नवीन मनोरा आमदार निवासामध्ये आवश्यक त्या सर्व सुविधांनी परिपूर्ण अशी एकूण ३६८ निवासस्थाने सदस्यांसाठी प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यामुळे विधिमंडळाच्या सर्व सदस्यांची एकाच ठिकाणी राहण्याची व्यवस्था होणार आहे. या इमारतीमधील प्रत्येक कक्षाचे क्षेत्रफळ साधारणतः १००० चौ. फूट असेल. या दोन्ही इमारतींमध्ये ८०९ वाहने एकाचवेळी पार्क करता येतील अशा पद्धतीचे पोडियम वाहनतळ असेल. या ठिकाणी विविध स्तरावर स्वयंपाकगृहे, बहुपयोगी हॉल, प्रत्येक मजल्यावर सभागृह, अतिथी कक्ष, व्यायामशाळा, उपाहारगृह, व्यावसायिक केंद्र, पुस्तकालय, ग्रंथालय, सांकृतिक केंद्र, छोटे नाट्यगृह अशा अत्याधुनिक सुविधा असणार आहेत.(amdar niwas)

नवीन आमदार निवासामध्ये प्रत्येक आमदारासाठी एक हजार चौरस फूट क्षेत्रफळ असलेली सदनिका दिली जाईल. या बांधकाम कंपनीला या कामाचा ठेका देण्यात आला असून 13,429 चौरस मीटर म्हणजेच जवळपास साडेतीन एकर भूखंडामध्ये आमदार निवास उभारले जाणार आहे.(amdar niwas)

इमारतीमध्ये देण्यात येणाऱ्या प्रत्येक घरात किचन तसेच प्रत्येक मजल्यावर सभागृह अतिथिगृह, ग्रंथालय, बुक शॉप, मिनी थिएटर आणि क्लब हाऊस या सुविधा देण्यात येणार आहे.(amdar niwas)

मनोरा आमदार निवास पडल्यामुळे मुंबई बाहेर असणाऱ्या आमदारांना निवासासाठी दर महिन्याला एक लाख रुपये सरकारकडून दिले जातात. यातून जवळपास शंभर कोटी रुपयांचा वार्षिक बोजा सरकारवर पडत असतो. यामुळे ८५३ कोटींच्या या प्रकल्पाची किंमत १२७० कोटींवर गेली. प्रकल्प रखडल्याने ४०० कोटींपेक्षा खर्च वाढला आहे. सुमारे १२०० कोटी खर्च करून विधानसभेच्या २८८ तर विधान परिषदेच्या ७८ अशा एकूण ३६८ आमदारांसाठी एकाच संकुलामध्ये निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे.(amdar niwas)

४० व २८ मजल्यांच्या दोन उंच इमारतींसाठी ५.४ वाढीव चटईक्षेत्र निर्देशांक मंजूर करण्यात आला असून पुढील काही महिन्यात हे काम पूर्ण होईल.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Leave a Comment

Don`t copy text!